BALBHART 
उत्तर महाराष्ट्र

बालभारतीतर्फे दहावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन 

तुषार देवरे

देऊर ः "कोरोना'मुळे सर्व शाळा-महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. यात प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावे, त्यांचा अभ्यास सुरूच राहावा, त्यांची अध्ययन- अध्यापनाची प्रक्रिया सुरूच राहावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अर्थात "बालभारती'ने "लर्न फ्रॉम होम'द्वारे पहिली ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तके दहा भाषांच्या माध्यमातून "ऑनलाइन पीडीएफ' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापनाला वेग दिला आहे. तसेच यातून पालक व विद्यार्थ्यांची पुस्तकांची चिंता दूर झाली आहे. 

बालभारतीच्या (ई बालभारती) http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या संकेतस्थळावर क्‍लिक केल्यानंतर ईबालभारतीचे पेज दिसेल. त्यावर "सिलॅबस इअर'मध्ये 2006 पासून 2020 पर्यंतची वर्षे दिली आहेत. यामध्ये ज्या वर्षाचे पुस्तक हवे आहे त्या वर्षाला "टच' करावे. या पेजवर "बुक टाइप्स'मध्ये पहिली ते बारावीपर्यंतची ऑनलाइन पाठपुस्तके, तसेच ई-बालभारती, बोलकी बालभारती, आठवी ते दहावी विज्ञान, भूगोल, संस्कृत विषयाचे व्हीडीओ स्वरूपातील साहित्य, पहिली ते दहावीसाठी दीक्षा मोबाईल ऍप, क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिग प्रश्न, बालभारती यू ट्यूब वाहिनी, पाठ्यपुस्तके मंडळाचे ई बालभारती ऍप, किशोर मासिक, अवांतर वाचनासाठी वेबसाईट व ऍप्लिकेशन, पहिली ते बारावीच्या सर्व विषयांचे ई साहित्य संग्रह, सीबीएसई शिक्षा वाणी पॉडकॉस्ट आदी साहित्यही उपलब्ध आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना सहजपणे पाठ, प्रकरणनिहाय अभ्यास करता येत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाइन शिक्षण पद्धतीत ई बालभारतीमुळे मुलांना स्वयंअध्ययन करता येत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

Pune Crime : कोमकरच नव्हे तर सोम्या गायकवाड टोळीही आंदेकरांच्या रडारवर; आयुष कोमकर प्रकरणी धक्कादायक खुलासा

Gokul Milk Kolhapur : ‘गोकुळ’ दूध संघातील संचालक वाढ, उत्पादकांच्या हिताचा निर्णय असल्याचे सिद्ध करावे लागणार

Maratha Reservation: दुहेरी आरक्षण शक्य आहे का? मराठा समाजाबाबत राज्य सरकारला विचारणा

Abeer Gulal :फवाद खान वाणी कपूर स्टारर ‘अबीर गुलाल’ २६ सप्टेंबरपासून भारतात चित्रपटगृहात

SCROLL FOR NEXT