dhule
dhule 
उत्तर महाराष्ट्र

स्वयंशिस्त पाळली तर 50 हजार हातांचा प्रश्‍न सुटेल! 

निखिल सूर्यवंशी

धुळे : शहरासह जिल्ह्यात अंशतः "लॉक डाउन' व्हावे, अर्थचक्र पुन्हा फिरावे, असे अनेकांना वाटते आहे. या अनुषंगाने येथील धुळे व्यापारी महासंघाने समर्पक भूमिका मांडताना "कोरोना'च्या संक्रमाणाची नेमकी स्थिती अभ्यासून आणि यासंबंधी "सोशल डिस्टन्सिंग', विविध निकषांची काटेकोर अंमलबजावणी, स्वयंशिस्त, चोरट्या मार्गांसह जिल्ह्याच्या सर्व सीमा कठोरतेने "सील' ठेवल्या तर अंशतः "लॉक डाउन'चा प्रयत्न अमलात आणणे शक्‍य आहे. तसे झाल्यास महासंघाच्या कार्यक्षेत्रातील व्यापार, व्यवसायांचे अर्थचक्र सुरू होऊन सरासरी 50 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटू शकेल, असे मत मांडले. 
संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'च्या पार्श्‍वभूमीवर "उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही..' अशा मथळ्याखाली "सकाळ'ने रविवारी (ता. 12) राज्यात विशेष संपादकीय प्रसिद्ध केले. त्यावर सर्वत्र विचारमंथन सुरू झाले. येथील धुळे व्यापारी महासंघानेही या भूमिकेला समर्थन दर्शविले. 

अर्थचक्राबाबत विचारमंथन 
हा धागा पकडून व्यापारी महासंघाशी "सकाळ'ने आज संवाद साधला असता ते म्हणाले, की "कोरोना'ची संक्रमणावस्था, भीती "लॉक डाउन'ची स्थिती ठरवत आहे. देशात वेळेत "लॉक डाउन' झाल्याने इतर देशांप्रमाणे आपल्याकडे रुग्णांची संख्या अधिक उसळली नाही. तरीही खबरदारी म्हणून तांत्रिकदृष्ट्या "लॉक डाउन'ची मर्यादा वाढविण्यात आली आहे. राज्याची स्थिती पाहता प्रभाव नसलेले (ग्रीन), अत्यल्प प्रभावित (ऑरेंज) आणि तीव्र प्रभावित (रेड) जिल्हे, असे वर्गीकरण करत तेथे टप्प्याटप्प्याने अर्थचक्र पूर्ववत सुरू करता येईल का, याविषयी विचारमंथन सुरू आहे. 

आजही 22 टक्के गुंतलेले 
"लॉक डाउन', संचारबंदीत किराणा, मेडिकल, भाजी मार्केट, डेअरी सुरू आहे. या गरजेच्या व्यवसायांसह व्यापारात सरासरी 20 ते 22 टक्के व्यावसायिक, व्यापारी गुंतलेले आहेत. ते कधीच बंद नसतात. इतर व्यापार, व्यवसाय सुरू ठेवायचे किंवा सुरू करायचे असतील तर "कोरोना'च्या संक्रमणाचा धोका किती, ते लक्षात घ्यावे लागेल. 

या कराव्या लागतील उपाययोजना 
अंशतः "लॉक डाउन' होण्यासाठी या आजाराचा प्रभाव नसलेल्या भागात सर्वप्रथम चोरट्या मार्गांसह जिल्ह्यालगत, तालुक्‍यालगतच्या सर्व सीमा कठोरतेने बंद ठेवाव्या लागतील. नातेवाईकच काय अन्य कुणीही बाहेरून आत व आतून बाहेर जाता कामा नये. जिल्हा किंवा तालुका, शहरांतर्गत बारा तास व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याऐवजी 8 ते 10 तासांवर मर्यादा आणावी लागेल. गर्दी टाळून "सोशल डिस्टन्सिंग' सक्तीने पाळावे लागेल. व्यापारी महासंघ आणि प्रशासनामध्ये समन्वयातून मार्गदर्शक तत्त्वे तयार करून निकषांप्रमाणेच व्यवहार होण्यासाठी परस्परांना विश्‍वास द्यावा लागेल. स्वयंशिस्त अंगी रुजवावी लागेल. अशा सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. ग्राहकांचा कमी- अधिक प्रतिसाद लाभला तरी एसी, कुलर व गरजेच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी होणार नाही, हे पाहणे अतिमहत्त्वाचे ठरेल. मेळावे, सार्वजनिक उत्सव, सण असले प्रकार कटाक्षाने टाळावे लागतील. जर्मनी, उत्तर कोरिया आदी ठिकाणी अर्थचक्र सुरू होण्यासाठी मार्ग काढला गेला आहे. तेथे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग व विविध निकष पाळले जात आहेत. आपल्याकडे व्यवहार सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. मात्र, त्यासाठी योग्य पावले टाकून पुढे जावे लागेल, असे धुळे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले. 


सध्याच्या "लॉक डाउन'मुळे व्यवसायाला दोन ते अडीच आठवड्यांचा "सेट बॅक' बसला आहे. सोळाव्या दिवशी लगेचच व्यवसाय सुरू होईल, असे नाही. आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला सरासरी नऊ ते दहा महिने लागतील. ते परवडेल. परंतु, "कोरोना' विविध उपाययोजनांतून नियंत्रित ठेवून अभ्यासाअंती अंशतः "लॉक डाउन' करता येऊ शकेल. अमेरिका, स्पेन, इटली आदींकडून झालेल्या चुका आपल्याला टाळाव्यात लागतील. स्वयंशिस्तीवर अर्थचक्राचे बरेच गणित अवलंबून आहे. 
- नितीन बंग, अध्यक्ष, धुळे व्यापारी महासंघ 

अभ्यासपूर्ण चाचपणीनंतर अंशतः "लॉक डाउन' केल्यास व्यवसाय, व्यापार पाच ते सहा तास सुरू ठेवावेत. नोकर, कामगार वर्गाला वेतन दिले जावे, अशी सूचना आहे. तो देणे, सरकारचा कर, लाइट बिल, बॅंक सीसी बिल पूर्ण भरणे टळणार नाही. इतर वर्गाप्रमाणे व्यापारी, व्यावसायिकाला सवलती नाही. "लॉक डाउन'मुळे तो अडचणीत आला असताना त्याने पैसा कुठून आणावा? त्यावर मुख्यमंत्र्यांसह सरकारने विचार करावा व उपाययोजना अमलात आणाव्यात. 
- किशोर डियालानी, मानद सदस्य, धुळे व्यापारी महासंघ 


"कोरोना'मुळे महिन्यापासून घरीच कोंडल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न जटिल बनला आहे. पतीचे निधन झाल्याने मला रोजच्या कामाशिवाय पर्याय नाही. मिळकत मिळणार नाही. ओळखीच्या व्यक्‍तींकडून हातउसनवारीने पैसे घेऊन उदरनिर्वाह सुरू आहे. अंशतः "लॉक डाउन' झाल्यास साडी सेंटरमध्ये पुन्हा कामाला जाता येईल. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. 
- छाया जाधव, "हेल्पर', श्‍यामकुमार साडी सेंटर, धुळे 
 
"कोरोना'मुळे जिल्ह्यात लागू झालेल्या "लॉक डाउन'मुळे परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. महिन्यापासून सायकलचे दुकान बंद असल्याने दैनंदिन रोजंदारी बंद झाली आहे. परिणामी हातउसनवारीच्या पैशांतून परिवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे. दोन महिन्यांपासून घरभाडे थकले असून, "लॉक डाउन' खुले न झाल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनेल. त्यामुळे अंशतः "लॉक डाउन' व्हावे. 
- गणेश रासकर, सायकल कारागीर, स्टेशन रोड, धुळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT