corona corona
उत्तर महाराष्ट्र

अहमदनगर मधील कोरोना स्थितीमुळे धुळ्यांची चिंता वाढली

Dhule corona News : जिल्ह्यात दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. दुसऱ्या लाटेत केवळ वयोवृद्ध नव्हे, तर काही तरुणांचाही बळी गेला.

सकाळ डिजिटल टीम


धुळे : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाचा (corona) संसर्ग नियंत्रणात आला आहे. सद्यःस्थितीत तपासणी चाचणीअंती (corona test) बाधित आढळणाऱ्या अहवालांची संख्या शून्य येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह व्यावसायिक आणि नागरिकांना आश्वासक दिलासा मिळत आहे. परंतु, असे असतानाच शेजारील नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (corona patient) पाच दिवसांत वाढीस लागली आहे. पुण्याहून नगरमार्गे धुळे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील दिलासादायक वातावरणाला काळजीची किनार लागली आहे.

(corona situation in ahmednagar threatens dhule district)


दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तसेच ॲक्टिव्ह पाच रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. दुसऱ्या लाटेत केवळ वयोवृद्ध नव्हे, तर काही तरुणांचाही बळी गेला. अनेक उपाययोजना केल्यानंतर शहरासह जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागला. जिल्ह्यातील सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले. अनेकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत.

सद्या समाधानकर स्थिती

वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्यहित राखणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे स्थितीत सुधारणा होत आहे. असे असले तरी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दी करू नये, मास्कचा सतत वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक आहे.

पण काळजी वाढली..

तरी शेजारील नगर जिल्ह्याने मात्र काळजी वाढविली आहे. पुण्याहून धुळ्यात येणारे अनेक जण नगरमार्गे येतात. अशा नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणेने तत्काळ प्रभावी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत तयारी करणाऱ्या प्रशासनाने या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT