Sand Sand
उत्तर महाराष्ट्र

धुळे शहरातही वाळू तस्कर सक्रिय

Dhule Sand News: काही वर्षांपासून नागरिक सजग झाल्यामुळे नदीकाठावरील वाळूचा उपसा करण्यास विरोध होऊ लागला.

सकाळ डिजिटल टीम


धुळे ः महसूल विभागाची (Revenue Department) कार्यपध्दती लक्षात घेत शहरात वाळू तस्कर सक्रिय झाले आहेत. बहुसंख्य महसूल कर्मचारी सकाळी अकरापासून कार्यरत होतात. त्यांची ही मानसिकता लक्षात घेत वाळू तस्करांनी (Sand smuggler) आपला कार्यभार सकाळी सहा ते अकरापर्यंत उरकण्यास सुरवात केली आहे. शहरात पंचवटीजवळ पांझरा नदीपात्रातून पहाटे वाळूची तस्करी सुरू होते.

(dhule district and city sand smuggler active)

उपशामुळे तेथे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. या ठिकाणा जवळच नागरी वसाहत आहे. त्यामुळे विविध समस्यांच्या स्थितीला जबाबदार कोण, असा परिसरातील रहिवाशांचा प्रश्‍न आहे.
जिल्ह्यातून तापी, पांझरा, बुराई, बोरी अशा अनेक नद्या वाहतात. नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. काही वर्षांपासून नागरिक सजग झाल्यामुळे नदीकाठावरील वाळूचा उपसा करण्यास विरोध होऊ लागला. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी वाळू उपसा करण्यास परवानगी दिली जाते. नदीपात्रातील वाळू आणि डोंगरमाथ्यावरील गौण खनिजाची जबाबदारी तलाठी, मंडलाधिकाऱ्यांची असते. तलाठी आणि मंडलाधिकारी सकाळी अकरानंतर सक्रिय होतात. याच स्थितीचा वाळू तस्करांनी गैरफायदा उठविण्यास सुरवात केली आहे.


शहरापासून दूर नव्हे, तर शहराच्या कार्यक्षेत्रातूनच वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. देवपूरमध्ये मोठ्या पुलाजवळच सकाळी सहा ते अकरा या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणाजवळ कष्टकऱ्यांची वसाहत आहे. तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्यामुळे या क्षेत्रात चार ते पाच फूट खोलीचे खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसामुळे नदीपात्रातून काही प्रमाणात पाणी वाहत आहे. वाळू तस्करांनी केलेल्या खड्ढ्यांमध्ये पाणी साचू लागले आहे. नदीकाठावरील कष्टकऱ्यांच्या वसाहतीतील मुले नदीपात्रात खेळण्यास जातात. मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमध्ये लहान मुले पडून दुर्घटना होऊ शकते. वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर देवपूर पोलिस ठाणे आहे. हा प्रश्‍न महसूल विभागाच्या अखत्यारित आहे, असे सांगत पोलिस उद्‌भवणाऱ्या स्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT