उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात वनाधिकाऱ्यांचे ‘श्राद्ध’; मेंढपाळ चराई क्षेत्र वाद

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो

सकाळ डिजिटल टीम

धुळे : मेंढपाळांच्या चराई क्षेत्राच्या वादाप्रकरणी वन विभागाच्या (Forest Department) निषेधार्थ ठेलारी समाजातील (Thelari society) ५५ जणांनी येथील वन विभागाच्या कार्यालय (Forest Department Office Dhule) परिसरात मुंडण केले. तसेच वन विभाग मेंढपाळांना जाणीवपूर्वक त्रास देतो, असा आरोप करत ठेलारी महासंघाने अधिकाऱ्यांचे ‘श्राद्ध’ घालत आंदोलन (Movement) केले. त्याची दखल घेतली नाही, तर पंधरा दिवसांत वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. (forest department office dhule thelari society movement)



मेंढपाळांसाठी असलेले ६८ हेक्टर क्षेत्र कुठले, असा प्रश्न उपस्थित करीत ठेलारी महासंघाने बुधवारी (ता.३०) येथे वन विभाग कार्यालयात पिंडदान करीत मुंडण आंदोलन केले. जिल्ह्यातील अनेक गावांत मेंढपाळ स्थिरावले आहेत. त्यांच्याकडील मेंढ्यांना चारण्यासाठी शासनाने ६८ हेक्टर क्षेत्र देऊ केले. परंतु, ते क्षेत्र कोणते? याबाबत स्थानिक वनाधिकारी स्पष्टीकरण देत नाहीत. मेंढ्या चारताना मेंढपाळांना त्रास दिला जातो. मेंढ्या बेकायदा चारल्या असे सांगून दंड वसूल केला जातो. मेंढपाळांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे मेंढ्यांचे पालनपोषण करायचे कसे, असा प्रश्‍न मेंढपाळांचा आहे.

वन विभाग दाद देत नसल्याने संतप्त ठेलारी समाजाच्या ५५ जणांनी आंदोलन केल्याचे आंदोलक शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, दिनेश सरग, मोतीराम गरदरे, ज्ञानेश्वर सुळे, मोहन भिवरकर, विनोद खेमनर, पप्पू थोरात, भारत शिंदे, चंद्रकला मासुळे, रोहन खेमनर, पन्नालाल सूर्यवंशी, पंकज मारनर, प्रवीण खामगळ, नाना ठेलारी, पिंटू भिवरकर, रामचंद्र पडळकर, गोविंदा रूपनर, नाना पडळकर, समाधान ठोंबरे, संदीप वाघमोडे आदींनी सांगितले. ते म्हणाले, की अनेकदा चराई क्षेत्राची मागणी केली. पण, ती न दाखवत वन विभाग अन्याय करीत आहे. त्यामुळे आता आत्मक्लेश करीत मुंडण केले. मागणीबाबत पंधरा दिवसांत अंतिम निर्णय झाला नाही, तर वन क्षेत्रावर ठेलारी महासंघाचे फलक लावत ते मेंढ्या चारण्यासाठी सुरक्षित केले जाईल. पिढ्यान् पिढ्या मेंढ्यांचे पालनपोषण करीत ठेलारी कुटुंब उदरभरण करतात. वन विभागाच्या एककल्ली कारभारामुळे मेंढपाळ त्रासले आहेत. पिंडदान आणि मुंडणाच्या या आंदोलनामुळे आता उपवनसंरक्षक भोसले यांनी उचित निर्णय घ्यावा, असे आंदोलकांनी सांगितले.

आमदार पाटील यांचा पाठिंबा
मेंढपाळांच्या आंदोलनास काँग्रेससह राज्य कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी पाठिंबा दिला, अशी माहिती माजी आमदार शरद पाटील यांनी दिली. पक्षाचे ज्ञानेश्वर पाटील, बोरीसचे उपसरपंच कुणाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT