accident 
उत्तर महाराष्ट्र

ट्रकच्या धडकेत दोन मावसभावांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा

शेणपूर : साक्री- पिंपळनेर मार्गावरील येथील शेणपूर फाट्यावर (ता. साक्री) दुपारी दीडच्या सुमारास ट्रक व मोटारसायकलचा अपघात होऊन दोन मावसभाऊ जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. 


साक्रीहून पिंपळनेरकडे जाणारा ट्रक (एमएच10/एडब्ल्यू 7310) व पिंपळनेरहून साक्रीकडे येणाऱ्या मोटारसायकलची (एमएच18/एएफ 6592) येथील शेणपूर फाट्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. यात मोटारसायकल बसलेले दोन तरुण जागीच ठार झाले, तर तिसरा गंभीर जखमी झाला. त्याला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिन्ही तरुण गंगापूर (ता. साक्री) येथील रहिवासी असून, ते पिंपळनेर येथून कामावरून परत येत असताना हा अपघात झाला. योगेश अप्पा गरदरे (वय 29) व अजय भटू कोरटकर (वय 16) या दोन मावसभावांचा मृतांमध्ये समावेश आहे. विलास तान्हू कारंडे (वय 30) हा गंभीर जखमी आहे.

अपघातानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह रस्त्यावरच पडून होते. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस आल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT