girl atyachar 
उत्तर महाराष्ट्र

तुझ्याशी लग्न करतो सांगत अत्याचार...अल्पवयीन मुलगी गर्भवती 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : प्रेम व लग्नाचे आमीष दाखवून कुसुंबा (ता.धुळे) येथील सोळा वर्षीय युवतीवर एकाने लैंगीक अत्याचार केला. त्यातून युवती गर्भवती झाली असून संशयिताविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 


गावातीलच परिचयातील अल्पवयीन मुलीशी मैत्रीचा हात पुढे केला. यानंतर तिला हळूहळू मैत्रीच्या जाळ्यात ओढून तुझ्याशी लग्न करतो म्हणून सांगत शारीरीक संबंध केले. यात मुलगी गर्भवती राहिली आहे. राहूल नथ्थू कोळी (वय 22, रा.विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर, साक्री रोड, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. परीचय असलेली कुसुंबा येथील युवतीस (वय 15 वर्षे दहा महिने) याने प्रेमाचे आमीष दाखविले. त्यानंतर लग्न करण्याचेही आमीष दाखवून पिडीतेवर लैंगीक अत्याचार केला.

ऑक्‍टोंबरपासून संबंध 

नेर येथील हॉटेल अशोक येथे नेऊन युवतीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती युवती गर्भवती राहीली. ऑक्‍टोबर 2019 ते 23 फेब्रुवारी दरम्यान प्रकार घडली. घडलेल्या प्रकाराबाबत पिडीतेने आईला सांगीतले. आईच्या मदतीने पिडीतेने तालुका पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यानुसार संशयित राहूल कोळी याच्याविरूध्द लैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. महिला पोलिस अधिकारी सारीका कोडापे यांनी पिडीतेच्या आईची इन कॅमेरा फिर्याद घेतली. पिडीतेची श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान संशयित राहूल कोळी पसार झाला. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Election Result : बांगलादेशात BNP ला स्पष्ट बहुमत, तारिक रहमान होणार पंतप्रधान; भारतविरोधी 'जमात'ला मोठा झटका

Pune News : ‘स्वीकृत’व्हायचंय, मग मोजा लाखो रुपये; एजंटांचा सुळसुळाट

Drugs Seized : पुणे विमानतळावर पाच कोटींचे अमली पदार्थ जप्त

Kolhapur Zilla Parishad President : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शाहूवाडी तालुक्याला, प्रमुख नेत्यांची होणार बैठक; राजकुंवर गायकवाड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत

Pune News : समाविष्ट २३ गावांचे अधिकार महापालिकेकडे; ‘पीएमआरडीए’तून गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT