crime
crime 
उत्तर महाराष्ट्र

पोलिसांनी केला क्राईम पेट्रोल सीन; जेलमध्ये मृत्‍यू पण मृतदेह फेकला रस्‍त्‍यावर, अखेर गुन्हा दाखल

संदाशिव भालकर

दोंडाईचा (धुळे) : येथील पोलिसांच्या ताब्यातील मोहन सदाशिव मराठे (वय ४५) यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी शुक्रवारी (ता. ११) तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत धुळ्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक रविकिरण तुकाराम दरवडे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोंडाईचा येथील संत कबीरदासनगर येथील रहिवासी असलेले मोहन सदाशिव मराठे यास दोंडाईचा पोलिसांनी तांदूळ चोरी प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. दरम्‍यान मोहन मराठेंचा मृत्यू संशयास्पद असल्याने सीआयडी चौकशी सुरू होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलिस कॉन्स्टेबल वासुदेव जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी बेकायदेशीर रखवालीत ठेवून मोहन मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच फौजदारी पात्र कट रचून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृत मोहन मराठे यास दोंडाईचा शहादा रोडवरील पीरबल्लीजवळ रस्त्यावर अपघात होईल, अशा पद्धतीने टाकून दिले होते.

आईला मृतदेह दिल्‍याचा खोटा पुरावा
मानवी शवाची अप्रतिष्ठा केली. तसेच मोहन यास आईच्या ताब्यात दिल्याचे खोटे पुरावे तयार केले. गुन्ह्याची माहिती कायदेशीरपणे त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी होऊन दोंडाईचा पोलिस ठाण्यात सीआयडी धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. 

सीआयडीने केले उघड
या गुन्ह्याचा पुढील तपास नंदुरबार येथील सीआयडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र भावसार यांच्याकडे सोपविला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भावसार तपास करीत आहेत. वासुदेव जगदाळे, सीताराम निकम, राहुल सोनवणे या तीन जणांना शुक्रवारी (ता. ११) अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT