residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी मंडळाना  सवलतीच्या दरात वीज 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी 
दिली जाणार आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश कंपनीने क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. 

सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे 4 रुपये 38 पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे. वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी गणेश मंडळाना अधिकृतच वीज घेता यावी यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचे दर कमी ठेवले आहेत. गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका टाळावा असे वीज कंपनीने आवाहान केले आहे. 

सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होतो. वायर्स लूज किंवा अनेकठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्‍यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु 
केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते. त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

टोल फ्री क्रमांक 
गणेशोत्सव मंडळाना वीज विषयक तातडीच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक 1912, 1800-102-3435 किंवा 1800-233-.3435 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT