ghantagadi GPS jalgaon
ghantagadi GPS jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

घंटागाड्यावर "जीपीएस' यंत्रणेची नजर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेने दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका दिला आहे. तसेच महापालिकेने खरेदी केलेल्या 85 घंटागाड्या मक्तेदाराला भाड्याने दिल्या असून या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे ठरविलेल्या रुट नुसार आता घंटागाड्या जाऊन कचरा संकलन करता का नाही यावर आता जीपीएस यंत्रणेवरून नजर ठेवली जाणार आहे. 

महापालिकेने शहरात दैनंदिन स्वच्छतेसाठी एकमुस्त ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. चार महिन्यापासून शहरात मक्तेदाराकडून सफाईचे काम सुरू आहे. परंतु मक्तेदाराच्या कामावरून ओरड होणे ते कर्मचाऱ्यांचे पगार न देण्यावरून अनेक वाद या सफाईच्या ठेक्‍याच्या संदर्भात झाले. त्यात 
महापालिका व मक्तेदार यांच्या झालेल्या स्वच्छतेच्या करारनाम्यात घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा करार झाला होता. त्यानुसार वॉटर ग्रेस कंपनीने सर्व 85 घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसवली असून आठ दिवसापासून ती कार्यान्वित करण्यात आली आहे. 

महापालिकेत कंट्रोल रूम 
महापालिकेच्या आरोग्य विभागात जीपीएस यंत्रणेचे कंट्रोल रूम ठेवण्यात आले आहे. यात मक्तेदाराचा तांत्रिक काम पाहणारा कर्मचारी व महापालिकेचा कर्मचारी पाहत आहे. यात सर्व गाड्या वेळेत दिलेल्या रुट नुसार जात आहे का, किंवा वाहन कुठे किती वेळ थांबले याचा सर्वच तांत्रिक अहवाल दररोज केला जात आहे. 

कचरा संकलनाचा दर्जा सुधारेल 
घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविल्याने सर्व घंटागाड्या दिलेल्या मार्गानुसार दिलेल्या वेळेत जाऊन कचरा संकलन होते का नाही हे या जीपीएस यंत्रणेमुळे समजणार आहे. त्यामुळे घंटागाडी दिलेल्या ठिकाणी 
न जाणे, अथवा वेळेत न जाणे असे प्रकार या यंत्रणेमुळे कमी होऊन कचरा संकलनाचा कामाचा दर्जा नक्कीच सुधारणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT