उत्तर महाराष्ट्र

त्याला पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला... 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चार वर्षीय बालक गुरुवारी पिंप्राळा रेल्वेगेटजवळील रिंगरोडवर एकटा फिरत होता. नागरिकांच्या नजरेस पडला पण त्याला बोलता येईना की... त्याची भाषा समजेना... मग कुटुंबीयांचा शोध घेण्याची अडचण होती. शेवटी नागरिकांनी बालकाला जिल्हा पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुरुवारी दिवसभर सांभाळत त्याच्या कुटुंबीयांचा 24 तासांत शोध घेऊन सुखरूप स्वाधीन केले. त्याला पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. 

पिंप्राळा रेल्वेगेटजवळील रिंगरोडवर गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चार वर्षांचा बालक एकटा फिरत होता. यावेळी रस्त्यावरून रवींद्र गोपाळ सोनवणे (रा. विठ्ठलपेठ) हे कामावर जात असताना त्यांना तो बालक दिसला. त्यांनी थांबून बालकाला आई- वडिलांची विचारपूस केली. मात्र, त्याचे बोलणे समजत नव्हते. याठिकाणी डॉ. वसंत बापूराव देशमुख (रा. दत्त कॉलनी), मोहम्मद नूर अब्दुल गफ्फार मणियार हे आले. नातेवाइकांचा शोध घेतला पण मिळून आले नाही. त्यामुळे सोनवणे यांच्यासह दोघांनी माणुसकी दाखवून बालकास जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. 

बालक सांभाळताना दमछाक 
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बालकास आणल्यानंतर याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड त्यास सांभाळत होत्या. मात्र, बालक पळून जात होता. तर गुन्हे शोध पथकातील नाना तायडे, अरविंद देवरे यांच्यावर दुचाकीवर बसवून फिरवूनही आणले. दिवसभर या बालकाने कर्मचाऱ्यांचे मनोरंजनही केले. मात्र, त्याला सांभाळतानाही होमगार्डसह कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. सायंकाळपर्यंत कुणीही कुटुंबीयांचा शोध न लागल्याने बालकाला हेड कॉन्स्टेबल दिलीप सोनार यांनी बाल निरीक्षणगृहात दाखल केले. याठिकाणी त्याबाबतचे पत्रही त्यांनी अधीक्षकांना दिले. 

अन्‌... कुटुंबीयांचा लागला शोध 
पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप सोनार यांनी बालकाबाबत पिंप्राळा स्टॉपवर रवींद्र राजाराम कोळी यांना माहिती दिली. छायाचित्र पाहिल्यावर कोळी यांनी त्याची ओळख पटवत या बालकाचे नाव विनोद उत्तम भिल असून पिंप्राळ्यातील भिलवाडा येथे राहणारा असल्याचे सांगितले. त्यानुसार कोळी यांनी विनोदचे वडील उत्तम भिल यांना सोबत घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. खेळता- खेळता विनोद एकटाच निघून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी बालनिरीक्षण गृहातून विनोदला ताब्यात घेऊन त्याचे वडिलांकडे स्वाधीन केले. उत्तम भिल हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर पत्नी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. हरवलेला मुलगा सुखरूप मिळाल्याने वडिलांच्या डोळ्यात मात्र अश्रू अनावर झाले होते. त्यांनी पोलिसांसह रवींद्र कोळी यांचे आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगली हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

SCROLL FOR NEXT