graph 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतोय 

सकाळन्यूजनेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. आज जिल्ह्यात 29 नवीन रुग्णांची वाढ झाली असून रुग्णांची संख्या 346 वर पोहचली आहे. दररोजचे वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच आहे. 

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. आज जिल्ह्यातील चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, कासोदा (ता. एरंडोल), जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदी विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 317 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 288 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 346 झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. 

भडगाव ठरतेय हॉटस्पॉट 
आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये भडगाव येथील 22, चोपडा येथील एक, सावखेडा (ता. पाचोरा) 1, रावेर 1, यावल 1, तर जळगावातील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज भडगावातील सर्वाधिक रुग्ण बाधित झाल्याने हॉटस्पॉट ठरत आहे. 

133 रुग्ण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे. यातील 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर आतापर्यंत 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Strike Mumbai : बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, बससेवा विस्कळीत; राज्य सरकारने संपावर घातली बंदी

Big News: भारताच्या संघात अचानक बदल, IND vs AFG तिसऱ्या वन डेसाठी स्टार खेळाडूची एन्ट्री... कोणाचा पत्ता झाला कट?

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली! 40 LPG टँकर भारतात येणार; व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा दूर होणार

Petrol-Diesel Rate: देशभरात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे अपडेटेड भाव

Fifa World Cup 2026: मेक्सिकोने इतिहास रचला, १९९८ नंतर प्रथमच असा चमत्कार झाला जो...; Round off 32 मध्ये जाणारा पहिला संघ

SCROLL FOR NEXT