mahanagarpalika
mahanagarpalika 
उत्तर महाराष्ट्र

जप्त केलेला कोट्यवधींच्या प्लॅस्टिकची परस्पर विक्री 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात राबविलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या मोहिमेत कोट्यवधी रुपयाच्या किमतीचे प्लॅस्टिक जप्त केले होते. परंतु हे जप्त केलेले प्लॅस्टिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, तसेच कारवाई न करण्यासाठी प्लॅस्टिक विक्रेत्यांकडून दरमहा 85 हजार रुपयांचा हप्ता आरोग्य विभागातील एक अधिकारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप कर्मचारी आनंद सोनवाल यांनी करून त्याबाबतच्या ऑडिओ क्‍लीप उपमहापौरांना दिल्या आहेत. उपमहापौरांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 
महापालिकेने शहरात प्लॅस्टिक विक्री बंदी नियमानंतर प्लॅस्टिक विक्रेत्यांच्या गोदामावर छापे टाकून 40 टनापर्यंतचा माल जप्त केला होता. या जप्त केलेल्या मालाची नियमानुसार विल्हेवाट न लावताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा माल पुन्हा विक्री करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच जप्त केलेल्या मालाचे प्रमाण कमी दाखवून महापालिका प्रशासनाकडे केवळ 70 हजार रुपयांचे बिले दाखविली असल्याचेही उपमहापौरांसमोर आनंद सोनवाल यांनी सांगितले. बैठकीला उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासह उपायुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यासह नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे, सुरेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील, मनोज काळे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. 

ऑडिओ क्‍लिपमुळे खळबळ 
आरोग्य विभागाचे युनिट हेड आनंद सोनवाल यांनी उपमहापौरांकडे तक्रारी मांडल्या. यात त्यांनी काही रेकॉर्डिंग उपमहापौरांसमोर सादर करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यातील मतभेदांमुळे अनेक धक्कादायक प्रकार देखील समोर आले आहेत. 

...असे आहेत आरोप 
शहरातील मार्केटमधील प्लॅस्टिक विक्रेत्यांवर करवाई न करण्याच्या बोलीवर दर महिन्याला या सर्व दुकानदारांकडून संबंधित अधिकारी 85 हजार रुपये घेत असल्याची माहिती सोनवाल यांनी उपमहापौरांना दिली. तसेच स्वत:च्या खासगी वाहनावर महापालिकेचा चालक ठेवून त्यांच्याकडून वाहन धुवून घेण्याचा आरोप सोनवाल यांनी केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT