collector-office jalgaon
collector-office jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

नियोजन आराखडा 436 कोटींवर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील वार्षिक योजनेसाठी 2020-21 मध्ये जिल्हा नियोजन मंडळामार्फत 436 कोटी 77 लाख 51 हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या सोमवारी (ता.20) त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची बैठक होत असून, या बैठकीत आराखड्यावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात येईल. 

राज्यात सत्तांतरानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनांच्या मंजुरीसाठी होणारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक देखील लांबणीवर पडली होती. मागील आठवड्यातच पालकमंत्र्यांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर तातडीने जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेण्याचे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सोमवारी (ता.20) दुपारी एकला नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील. पाटील यांच्या अध्यक्षतेत ही पहिलीच बैठक होत आहे. 

निधी खर्चाचे आव्हान 
सन 2019-20 या आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 70.62. टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम- 71.79 टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम (ओटीएसपी) 44.13, अनुसूचित जाती उपयोजना 99.47 असा एकूण 72.79 टक्के खर्च झाला आहे. उर्वरित निधी दोन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर आहे. 

यंदा 436 कोटींचा आराखडा 
सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा 436 कोटी 77 लाख 51 हजार रुपयांचा आहे. प्रशासकीय यंत्रणांनी 304 कोटीची अतिरिक्त 
निधीची मागणी केली आहे. 20 जानेवारीस होणाऱ्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली जाईल. 


राज्यस्तरीय बैठक 31 जानेवारीस 
जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी नाशिक विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 31 जानेवारीस विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे. यात जळगाव जिल्ह्याची बैठक दुपारी 12 ते 1 यावेळेत होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT