ram pawar
ram pawar 
उत्तर महाराष्ट्र

राजकारणी नसूनही नियोजनात परिपक्‍व

सकाळवृत्तसेवा

"मॅनेजमेंट' अर्थात "व्यवस्थापन'. कोणत्याही उपक्रमात त्याला महत्त्व असतेच. कारण ते व्यवस्थित झाले तर यश मिळते, कदाचित ते थोडक्‍यातही हुकते. मात्र, यशात उन्मादही नसतो आणि अपयशात खचणेही नसते. कारण नियोजन करणारा तेवढाच खंबीर आणि उभारी देणारा असतो. होय! राम अर्थात नवीन पवार त्यातील एक व्यक्तिमत्त्व. राजकारणात नाही; परंतु नियोजनात "परफेक्‍ट' आहेत. 
जळगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई पाटील यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश बाबूराव पाटील यांचे शालक. त्यांची ओळख "राम' नावानेच आहे. राजकारणाच्या पडद्यासमोर ते आजपर्यंत आलेलेच नाहीत. भगिनी पुष्पाताई आणि मेहुणे प्रकाश पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे त्यांच्याकडेच असतात. प्रकाश पाटील हे महापालिकेच्या राजकारणात 1987 पासून आहेत; तर पुष्पाताई 1997 पासून. प्रकाश पाटील व पुष्पा पाटील यांनी एकाच वेळी निवडणूक लढविलेली नाही. आलटून-पालटून ते निवडणूक लढले आहेत. मात्र, त्यांच्या निवडणुकीचे सर्व नियोजन राम पवार हेच करीत असतात. अगदी अर्ज दाखल करण्यापासून तर थेट प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंतचे सर्व कार्य ते करतात. राम राजकारणात नाहीत, कोणत्याही पक्षाचे काम करीत नाहीत. एवढेच नव्हे तर भगिनी नगराध्यक्षा असतानाही त्यांनी महापालिकेच्या कामांत कधीही हस्तक्षेप केला नाही. मात्र, सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे. शिवाय प्रभागात ते नेहमी नागरिकांशी संपर्क ठेवून असतात. गेल्या वेळच्या भगिनीच्या पराभवाचा अपवाद वगळता त्यांच्या नियोजनाला नेहमी यशच लाभले. या नियोजनात बंधू श्‍याम पवार यांची त्यांना नेहमीच साथ लाभली. परंतु आता ती साथ नसेल. गेल्या डिसेंबरमध्ये श्‍याम यांचे निधन झाले. त्यांची उणीव त्यांना नक्कीच जाणवणार आहे. तब्बल 22 वर्षांच्या यशस्वी नियोजनाच्या आणि अनुभवाच्या बळावर गेल्या वेळी प्रथमच राम यांनी पत्नी लीना यांना "मनसे'कडून निवडणुकीत उमेदवारी मिळविली होती. त्या विजयी झाल्या होत्या. आताही त्यांच्या भगिनी पुष्पाताई पाटील शिवसेनेतर्फे प्रभाग क्र. 11, तर त्यांच्या पत्नी लीना पवार याही शिवसेनेतर्फे प्रभाग क्र. 12 मधून निवडणूक लढवित आहेत. विशेष म्हणजे यावेळी दोन्हींच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन ते करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT