उत्तर महाराष्ट्र

"बेल फॉर वॉटर' पोचतेय जळगावपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : "पाणी म्हणजे जीवन' हे वाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. पण, लहानपणीच त्याकडे दुर्लक्ष करतो. वयानुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठरलेले असताना मुले पाणीच पीतच नाहीत. त्यातून त्यांना अनेक व्याधी जडतात. म्हणून आता केरळमधील शाळेतून सुरू झालेली "बेल फॉर वॉटर' ही संकल्पना जळगावपर्यंत येऊन पोचली आहे. 

"वॉटर बेल' संकल्पना 
मुले शाळेत आल्यानंतर अभ्यासाच्या नादात पाणी पिण्यास विसरतात. घरून आणलेली वॉटरबॅग तशीच्या तशी घरी घेऊन जातात. शाळेत पाणी न पिण्यामुळे मुलांना किडनी स्टोन, मूत्रसंसर्ग, डोकेदुखी, डिहायड्रेशन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याची जाणीव झाल्यामुळे केरळमधील इंद्रप्रस्थ विद्यालयाने मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी प्रथमतः "वॉटर बेल'ची सुरवात केली. ही बेल तीन वेळा होते. बेल वाजल्यानंतर मुलांनी थोडे थांबून पाणी प्यायला हवे, हा यामागचा उद्देश आहे. 

मुले पाणी कमी का पितात? 
पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचेही काम करते. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत मुलांचे एकाचजागी बसून खेळणे, मोबाईल पाहणे वाढलेय. यामुळे शरीरातील पचनयंत्रणा मंदावते. पर्यायाने पाण्याची गरजही मंदावते. तसेच अतिगोड, स्निग्ध पदार्थ वारंवार खाणाऱ्या मुलांना पाणी प्यावेसे वाटतच नाही. 

अशी आहे वयानुसार पाण्याची गरज (किमान प्रतिदिन) 

वयोमर्यादा पाण्याची गरज 
1- 3 वर्षे 1.3 लिटर 
4 -8 वर्षे 1.7 लिटर 
9 -13 वर्षे 2.4 लिटर 
14 - 18 वर्षे 3 लिटर 
19 -20 वर्षे 3.5 लिटर 


लहान वयोगटातील समस्या या शरीरातील पाण्याच्या अल्प प्रमाणामुळे उद्‌भवतात. त्यातील बद्धकोष्ठता, लघवीची समस्या, मूतखडा होणे यांचा संबंध येतोच. त्यामुळे लहान मुलांच्या शरीरातील एकूण पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. वरुण सरोदे, लहान मुलांचे मूत्ररोगतज्ज्ञ तथा शल्यचिकित्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT