उत्तर महाराष्ट्र

डेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांचा आज नवीन "प्रताप' समोर आला आहे. त्यांनी चक्क बचतगटाच्या संचालकाला मारहाण केल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या संदर्भात संबंधित व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

अंगणवाडीतील बालकांना गरम पोषण आहार आणि गरोदर मातांना अमृत आहार पुरवठ्याचे काम बचतगटांना देण्यात आले आहे. अभोडा बु. (ता. रावेर) या गावात हे काम करणाऱ्या गटाचे काम दोन महिन्यांपासून अचानक काढून घेत ते तडवी यांनी आपल्या मेहुणीच्या भाऊकीतील बचतगटाला दिले आहे. तथापि, आपल्या गटाचे काम का बंद केले, याबाबतची 
तक्रार सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याकडे देण्यासाठी कादर रुबाब तडवी आज (ता. 15) जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी सीईओ दिवेकर यांनी डेप्युटी सीईओ तडवी यांना बोलावून प्रकरण आपसांत मिटविण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तडवी हे कादर तडवी यांना विभागात घेऊन गेले आणि विभागात गेल्यानंतर त्यांनी चक्क तक्रारदार कादर तडवी यांच्या कानशिलात तीन- चार चापटा मारल्या. 

तडवींविरुद्ध पोलिसात तक्रार 
बचतगटाचे काम बंद केल्याची तक्रार सीईओंकडे केली आणि बचत आहार बंद केल्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने डेप्युटी सीईओ तडवी यांनी कादर तडवी यांना चापटा मारल्या. या प्रकरणी बचतगट चालक महिला व त्यांचे पती कादर तडवी यांनी डेप्टी सीईओ तडवी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 
 
बचतगटाकडून पुरेसा आहार, गरोदर मातांना अमृत आहार दिला जात नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे त्यांचे काम थांबवून दुसऱ्या बचतगटाला काम दिले आहे. यामुळे कादर तडवींनी कार्यालयात येऊन अर्वाच्य भाषेचा वापर केला. 
- आर. आर. तडवी,  डेप्युटी सीईओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT