nagrsevak andolan imege 
उत्तर महाराष्ट्र

अरे हे काय...चक्क नगरसेवकच बसले आत्मक्‍लेश आंदोलनाला ! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जळगाव शहरात गेल्या दहा दिवसापासून सफाई मक्तेदाराने स्वच्छतेचे काम बंद केल्याने शहरात सर्वत्र कचरा कोंडी झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात जागो जागी कचरा साचलेला असल्याने चांगला व स्वच्छ असलेला प्रभागाची वाट लागल्याने त्रस्त व नागरिकांच्या दररोजच्या शिव्यांची लोखोळी सहन करणाऱ्या नगरसेवकानेच आज महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वारावर आत्मक्‍लेश आंदोलन सुरू केले. 

गेल्या सहा महिन्यापूर्वी जळगाव महापालिकेने दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटीचा मक्ता दिला. परंतू पहिल्या दिवसापासून मक्तेदाराच्या बोगस कामामुळे नागरिक, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी दररोज महापालिकेस येवू लागल्या होत्या. त्यात दहा दिवसापूर्वी मक्तेदाराने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता व कचरा संकलन करण्याचा काम बंद केले आहे. त्यामुळे शहरात जागो जागी साचलेला कचरा, ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्या 
कुंड्या अशी भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

त्यात मक्ता सुरू होण्यापूर्वी जो प्रभाग चांगल्या स्थितीत होता त्या प्रभागाची आता भयानक परिस्थीती झाली आहे. तसेच काही प्रभाग क्रमांक 12 ची झाली असल्याने या प्रभागाचे शिवसेनेचे व गटनेते असलेले नगरसेवक अनंत जोशी हे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयसमोर आत्मक्‍लेश आंदोलन सुरू केले. 

स्वःताची वाटतेय लाज..! 
आंदोलन बाबत नगरसेवक जोशी म्हणाले, मक्तेदाराला सफाई मक्ता दिला आणि माझ्या प्रभागाची संपूर्ण वाट लावून टाकली. प्रभागात जागो जागी कचरा साचला असून नागरीक मला शिव्या घालत आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी नगरसेवक झालो पण महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरीक मला शिव्या घालत आहे त्यामुळे स्वःताची लाज वाटत आहे असे खंत त्यांनी 
व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT