meharun leke 
उत्तर महाराष्ट्र

मेहरुण तलाव परिसरात हजार वृक्षांची वनराई 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः अमृत योजनेंतर्गत शहरातील मेहरुण तलाव परिसराचा हरित क्षेत्र विकासात समावेश करण्यात आला आहे. त्या ठिकाणी एक हजार वृक्षांची वनराई साकारली जात आहे. महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी करून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आदेश मक्तेदाराला दिले. 

रविवारी  सकाळी महापौर सोनवणे यांनी मेहरुण तलाव परिसरात जाऊन वृक्षलागवडीची पाहणी केली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन लढ्ढा, शहर अभियंता सुनील भोळे, नेमाडे आदी उपस्थित होते. हरित क्षेत्र विकास कार्यक्रमात मेहरुण तलाव परिसरात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यांचे संगोपन केले जाणार आहे. मक्तेदाराकडून त्या ठिकाणी सुरू असलेल्या सर्व कामांची आणि सद्यःस्थिती महापौर भारती सोनवणे यांनी जाणून घेतली. तसेच वृक्षसंगोपन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

मेहरुण तलाव परिसराचा दिवसेंदिवस विकास होत आहे. तलावाकाठी फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तलावाकाठी फिरायला येणारे काही जण झाडांना लावलेल्या सुरक्षा जाळ्या तोडून टाकतात, बऱ्याच वेळा तर कोवळे झाडही तोडण्यात येते. तलाव परिसरात फिरताना आपल्यामुळे कोणत्याही वृक्षांची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर सोनवणे यांनी केले. या ठिकाणी येणाऱ्या जनतेनेही वृक्षांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

अंबरझरा पाटचारीचे पुनर्भरण 
भरल्यानंतर त्याच्या पाटचारीतून मेहरुण तलावात येत असते. परंतु ती चारी कच्ची असल्याने दरवर्षी फुटते किंवा कचऱ्याने भरते. त्यामुळे सर्व पाणी इतरत्र वाहून जाते. मेहरुण तलाव कायम भरण्यासाठी अंबरझरा ते मेहरुण पाटचारीचे पुनर्भरण आवश्‍यक असल्याचे निवेदन मराठी प्रतिष्ठानतर्फे महापौर भारती सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, विजय वाणी, आर्किटेक्‍चर शिरीष बर्वे, विद्याधर नेमाने आदी उपस्थित होते. दरम्यान, अंबरझरा पाटचारीचे अंदाजपत्रक लघुपाटबंधारे विभागाने तयार केले आहे. "मनपा'कडून यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून तो "डीपीडीसी'च्या बैठकीत सादर करण्यात येईल आणि निधीची मागणी करून लवकरात लवकर पुनर्भरण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन महापौर सोनवणे यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

Ganeshotsav Special Trains: नागपूर, मुंबई आणखी विशेष रेल्वे धावणार; गणेशोत्सवात चाकरमान्यांना आधार

Kolkata Hotel Fire : कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू, मध्यरात्री अग्नितांडवाने शहर हादरले

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Ambap School Tragedy: शाळेत हुशार, खेळात तरबेज ‘धनराज’ची एक्झिट जिव्हारी; क्रीडांगणावर सराव करताना पडल्याचे निमित्त

SCROLL FOR NEXT