rabbi hangam 
उत्तर महाराष्ट्र

अहो आश्‍चर्यम...रब्बीचा पेरा 171 टक्के! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रब्बी हंगामातील उत्पादनाची टक्केवारी बहुतांश थंडी किती प्रमाणात पडते, यावर अवलंबून असते. यंदा मात्र चक्क गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा 171 टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनीत पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची सर्वाधिक पेरणी केली आहे. 

गतवर्षी हवा तसा पाऊस न झाल्याने सर्वांच्याच आशांवर पाणी फिरले होते. रब्बी हंगामात केवळ 92 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र 139 टक्के पाऊस झाला. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने हाती आलेला हंगाम निसर्गाने हिरावून घेतला. अतिवृष्टीने मात्र जिल्ह्यातील सर्व मोठी, लहान शंभर टक्‍क्‍यांवर भरून वाहू लागली. त्याचाच परिणाम आजही जमिनीत ओल कायम आहे. खरीप जरी हाताचा गेला गेला तरी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर आशा कायम ठेवत गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. 

उन्हाळी पेरा सुरू 
उन्हाळी गहू, बाजरी, तीळ, तुरीचा पेरा अजूनही सुरूच आहे. शेतात ओल आहे. विहिरी, कूपनलिका, नाले यामध्ये पाण्याची पातळी कायम आहे. यामुळे शेतकरी कापूस उपटून त्याठिकाणी तीन महिन्यात येणारी वरील पिके घेत आहेत. 
... 

आकडे बोलतात... 
- रब्बीचे अपेक्षित क्षेत्र--1 लाख 55 हजार हेक्‍टर 
- पेरणी झालेले क्षेत्र--2 लाख 65 हजार 508 हेक्‍टर 
- हरभरा--71 हजार हेक्‍टर 
- गहू--77 हजार 133 हेक्‍टर 
- मका--70 हजार हेक्‍टर 
- ज्वारी--46 हजार हेक्‍टर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : हवामान विभाकडून पावसाचा ग्रीन अलर्ट, पण...; आणखी किती दिवस राहणार रिपरिप?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT