उत्तर महाराष्ट्र

रमजानमध्ये गरिबांच्या आनंदाचे समाधान! 

सकाळवृत्तसेवा

रमजान महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. यापेक्षा जास्त महत्त्व आणि आनंद हा गरिबाला मदत करून त्याला आनंद देण्यात आहे. अर्थात जकात म्हणून गरिबांना कपडे, सुकामेवा, अन्न-धान्य देवून एक मदतीचा हात दिला जातो. म्हणजे आपण ज्याप्रमाणे सण साजरा करतो आणि आनंद मनवतो. जे या आनंदापासून दूर राहतील. त्यांना मदत देवून हा आनंद देणे यातच समाधान असल्याचे राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

रमजानमध्ये महिनाभर चौदा- पंधरा तासांचा उपवास करत असतो. रोजा असताना देखील एक वेगळी एनर्जी परमेश्‍वर देत असतो. गरीब नातेवाईक किंवा परिसरातील मदत म्हणून आपल्याकडील वर्षभरातील कमाईमधील अडीच टक्‍के जकात काढून देत असतो. कोणाला कपडे तर कोणाच्या घरी सुकामेवा जाऊन देत असतो. हे करताना कोणाला सांगून नाही, तर आपल्या मनाला वाटले तेथे प्रत्यक्ष जाऊन त्या गरीब कुटुंबाला वस्तू देत असतो. 

- गफ्फार मलिक, प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी. 
 
 

सर्वांना ईद आनंदात साजरी करता यायला हवी, याकरिता जकात काढली जाते आणि ती गरीब व गरजूंना वस्तू घेऊन वाटली जाते. हे काम स्वतः देखील करत असतो. सकाळी रोजा सुरू करण्यापूर्वी सेहरी आणि रोजाचा उपवास सोडताना ईप्तारी करण्यासाठी गरिबांच्या घरी अन्नधान्य किंवा खाण्याच्या इतर वस्तू देत असतो. तसेच ईद साजरी करण्याचा आनंद गरिबांना देखील घेता यावा, याकरिता ईदच्या अगोदर सुकामेवाची पाकीट देतो. 

- ऍड. जमील देशपांडे, मनसे. 
 

रमजानमध्ये तीस दिवसाचे रोजे त्यासोबत पाच वेळची फर्ज नमाज आणि रात्री तराबीची वीस रकात नमाज यासह जकातीस विशेष महत्त्व आहे. दैनंदिन कामे सांभाळून तराबीच्या नमाजसह इतर फर्ज नमाज नियमित अदा करतो. तसेच इस्लाम धर्मानुसार जे मुस्लिम हैसियतदार व ऐपतदार आहे. अशांसाठी गरीब बांधवांना ही आनंदाने रमजान साजरा करता यावा; यासाठी जकात स्वरूपात कपडे, पैसे, धान्य देण्याचा आदेश अल्लाने केला आहे. त्यानुसार महिनाभर गरिबांना धान्य, पैसे, नवीन कपडे दरवर्षी जकात स्वरूपात देतो. गरजूंना सहरी व इफ्तारसाठी मदत सुद्धा वेळोवेळी करतो, जेणेकरून इतरांप्रमाणे ते देखील रोजे धरू शकतात. 
- ऍड. शेहबाज शेख, प्रदेश सचिव, भाजप अल्पसंख्याक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT