उत्तर महाराष्ट्र

राँग नंबर ठरला विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा 

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव ः मोबाईलवर चुकून लागलेल्या राँग नंबरमुळे मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विवाहितेवर दोघांनी शहरातील एका लॉजवर पाच दिवस अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तो शून्य क्रमांकाने येथील पोलिसात वर्ग झाला आहे. विवाहितेवर अत्याचार करणाऱ्यांपैकी एकाला धुळे येथून तर दुसऱ्याला चाळीसगावातून पोलिसांनी अटक केली आहे. 
ायाबाबत सविस्तर माहिती अशी, धुळे येथील संशयित आकाश प्रल्हाद रोकडे याने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. हा फोन चुकून मुंबईतील चेंबूर भागात राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेला लागला. सुरवातीला राँग नंबर लागला असे सांगून दोघांचे संभाषण संपले. त्यानंतर मात्र, पीडित महिला रोकडे याच्याशी संपर्कात आली. दोघांमध्ये मोबाईलवरून बोलणे वाढले. अशातच विवाहितेने ‘माझे माझ्या पतीशी जमत नाही, तो मला सतत मारहाण करतो. त्यामुळे जीवन जगावेसे वाटत नाही. मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईल’ असे पीडित महिलेने रोकडे याच्याशी बोलण्याच्या नादात त्याला सांगितले. त्यावर रोकडे याने ‘असे काही करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे सांगून महिलेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर दोघांमध्ये वेळोवेळी मोबाईलवरून संभाषण होत राहिले. ही संधी साधून रोकडे याने पीडित महिलेला चाळीसगावला बोलावले. ही घटना रोकडे याने त्याचा चाळीसगावचा मित्र करन राजाराम राखपसरे (रा. इंदिरानगर, चाळीसगाव) याला सांगितली. 

लॉजवर नेऊन अत्याचार 
ठरल्याप्रमाणे ही महिला चाळीसगावला आली. आकाश रोकडे व करन राखपसरे या दोघांनी तिला चाळीसगाव बस स्थानकासमोरील विनायक लॉजमध्ये नेले. १९ ते २३ जून २०१९ असे पाच दिवस या दोघांनी तिच्यावर वेळोवेळी संगनमताने अत्याचार केला. या दरम्यान संबंधित पीडित महिलेच्या मोबाईलवर तिच्या पतीसह नातलगांचे फोन येत होते. मात्र, संशयित करन राखपसरे व आकाश रोकडे हे दोघे महिलेला त्या मोबाईलवरून बोलू देत नव्हते. या दोघांकडून होणारे अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिला त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी धडपडत होती. अशातच एक दिवस तिच्या पतीचा तिला फोन आला व तिने तो उचलून आपण भावनेच्या भरात चाळीसगावला कसे आले आणि आपल्यावर दोघांनी कसा अत्याचार केला, याची माहिती दिली. त्यानंतर पीडित विवाहितेने दोघा संशयितांची नजर चुकवत नाशिक गाठले. तेथून ती त्र्यंबकेश्वर येथे गेली. त्या ठिकाणी तिचा पती आल्यानंतर त्याला आपबिती सांगितली. 


पोलिसात घेतली धाव 
महिलेवर वारंवार अत्याचार झालेला असल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर ती पतीसह मुंबईला घरी गेली. त्या ठिकाणी चुनाभट्टी पोलिसात त्यांनी धाव घेऊन झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार, चुनाभट्टी पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित करन राजाराम राखपसरे व आकाश प्रल्हाद रोकडे या दोघांच्या विरोधात भादंवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा नोंदवून तो शून्य क्रमांकाने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला व उपनिरीक्षक युवराज रबडे, नितीन पाटील, राहुल गुंजाळ, राकेश पाटील, मझरद्दीन शेख यांच्या पथकाने पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयितांपैकी आकाश रोकडे याला धुळ्याहून तर करन राखपसरेला चाळीसगाव येथून अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT