varangaon imege 
उत्तर महाराष्ट्र

वरणगाव पालिकेतील सर्वच प्रभागात फेरबदल 

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव : वरणगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी प्रभागांचे मंगळवारी आरक्षण जाहीर केले. प्रभाग रचनेचा पुढील कार्यक्रम गुरुवारी  जाहीर करण्यात येणार आहे. 

वरणगाव नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचे आदेशानुसार पूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे आणि मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय आरक्षण सोडतचा कार्यक्रम मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात झाला. या प्रसंगी महिलांचे ५० टक्के आरक्षण लक्षात घेता, पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. अनुसूचित जातीचे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १७ व अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग क्रमांक १८ असे आहेत. तर मागील २०१५ च्या निवडणूक कार्यक्रमात आरक्षण जाहीर झालेले प्रभाग यावेळी वगळण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १- सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक २ - नामप्र खुला वर्ग (ओबीसी) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक ३ - सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्रमांक ४ - सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्रमांक ५- सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक ६ - सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्रमांक ७- नामप्र महिला राखीव, प्रभाग क्रमांक ८ - सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९- नामाप्र खुला वर्ग, प्रभाग क्रमांक १०- सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्रमांक ११- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ - सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्रमांक १३- नामप्र महिला राखीव, प्रभाग क्रमांक १४- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १५- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १६- नामप्र खुला वर्ग महिला राखीव आहे. 

आर्वजून पहा : पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !

आरक्षणात ११ वर्षाची आर्या नीलेश झांबरे हिने इश्‍वरचिठ्ठी काढली. यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी, कर निर्धारण अधिकारी आझाद पटेल, पाणीपुरवठा अधिकारी गणेश चाटे, बांधकाम अधिकारी अभय गुटाळ, नगराध्यक्ष सुनील काळे उपस्थित होते. तर गंभीर कोळी, संजय माळी, गणेश कोळी, अनिल तायडे, राजू गायकवाड, राजू सोनार, रवि धनगर, कृष्णा माळी, प्रशांत माळी, सुधाकर मराठे, संतोष वानखेडे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT