उत्तर महाराष्ट्र

"लॉकडाऊन' मध्ये साकेगावच्या नविन पुलाचे होणार काम 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गातील तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरणाचे काम "कोरोना'मुळे रखडले आहे. मात्र साकेगाव (ता.भुसावळ) येथील साकेगावजवळील वाघूर नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. हा पूल केव्हाही पडण्या अगोदर चौपदरीकरणातील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढले आहेत. जिल्हा प्रशासनानेही या पुलाच्या कामास लॉकडाऊनमध्ये अत्यल्प कामगांराद्वारे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 

तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वीस मार्चपर्यंत वेगात सुरू होते. मात्र 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने वेगात सुरू असलेले कामही बंद पडले. यामुळे जून महिन्यापूर्वी चौपदरीकरणाच्या मार्गात येणारी मोठे पूल पूर्ण होणार होते. मात्र कोरोना'मुळे चौपदरीकरणाचे कामही बंद झाले. दरम्यान जळगाव ते भुसावळ दरम्यान येणाऱ्या वाघूर पूल कमकुवत होवून त्यावर खड्डेही पडले होते. यामुळे धोका निर्माण झालेला होता. त्यात काम बंद पडले, लॉकडाउनमुळे पुलावरील वाहतूकही कमी झाली. मात्र मालवाहतूक, अत्यावश्‍यक सेवांच्या वाहनांना परवानगी दिल्याने वाघूर नदीच्या पुलावरील वाहतूक वाढली. वाढलेली वाहतूक व लॉकडाउनचा 3 मेपर्यंत वाढलेला कालावधी लक्षात घेता येथील महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीत पत्रव्यवहार करून विशेष बाब म्हणून वाघूर नदीवरील नवीन पुलाच्या निमिर्तीस तातडीने परवानगी द्यावी, अन्यथा पूल कोसळेल व वाहतुकीला धोका निर्माण होईल असे पत्र दिले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला वाघूर नदीवरील पुलाचे काम करण्यास परवानगी देण्यास सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने वाघूर नदीवर नवीन पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. 

नवीन पुलाचे काम वेगात 
वाघूर नदीवरील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूने भराव जेसीबीने टाकण्याचे काम, पुलावर सुरक्षा कठडे तयार करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. सोबतच नवीन पुलाला जोडण्यासाठी चौपदरीकरणाच्या रस्त्याचेही काम सुरू झाले आहे. कामाची गती पाहता पंधरा मेपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

ठिकठिकाणी कामे सुरू 
महामार्गाच्या चौपदरकरणात येणारे दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकणे, रस्त्यांच्या दोन्हीकडेला असलेल्या गटारांवर धापे टाकणे, जोड रस्त्यांना जोडणारे खड्डे भरणे आदी कामे करताना वेल्स्पन कंपनीचे कर्मचारी काम करताना दिसताहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT