tondapur bibtra
tondapur bibtra 
उत्तर महाराष्ट्र

वर्षभरानंतर तो पुन्हा आला...नागरीक भयभीत 

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (ता. जामनेर) ः गतवर्षी चाळीसगाव तालुक्‍यात बिबट्याने चांगलाच हैदोस घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक मुक्‍या प्राण्यासह नागरीकांना देखील प्राण गमवावे लागले होते. तर अनेकजण जखमी झाले होते. अनेक दिवस नागरीकांमध्ये भितीचे वातावरण होते. तिच भिती पुन्हा तोंडापूर परिसरातील नागरीकांमध्ये आली आहे. कारण बिबट्याने एका गाईवर हल्ला करत मारल्याची घटना आज सकाळी घडली आहे. 

तोंडापूर शिवारात शेतात बांधलेल्या सहा गाईंपैकी एका दोन वर्ष वयाच्या गाईचा सकाळी बिबाट्याने फडशा पाडला. त्यामूळे शेतकरी व मजुरवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोंडापूर परिसराला लागून अजिंठा डोंगररांग असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. तोंडापूर येथील शेतकरी ईश्वर विठ्ठल सपकाळे यांच्या भारुडखेडा रस्त्यावर असलेल्या शेतात गट नंबर 177 मध्ये नेहमीप्रमाणे बोरीच्या झाडाखाली जनावरे बांधलेली होती. मात्र बिबट्याने सकाळी अचानक गाईवर हल्ला चढवुन मानीचा व पोटाचाभागाचा लचका तोडला. गळ्याच्या भागाला पंजाच्या नखानेही ओरबडले असल्याने गायीचा यात मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतात कापुस वेचणी चालु असुन मजुरांमधे बिबट्याच्या हल्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. आधीच कापूस वेचणीसाठी मजुरही मिळत नसल्याचे बोलले जात आहे. वनविभाग कडून जनजागृती करण्यात यावी अशी मागणी होत आहे 

वर्षभरापुर्वी हरणाची शिकार 
तोंडापूर परिसरातील याच शिवारात साधारण वर्षभरापुवी ईश्‍वर सपकाळे यांच्याच शेतात बिबट्याने हरणाची शिकार केली होती. तर त्याच परिसरात काही बकऱ्या व एक हरणीचा बिबट्याने हल्ला चढऊन ठार केले होते. यावेळी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रितसर पंचनामा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली गुरे रात्रीच्या वेळेस गावात नेऊन बांधावी, एकट्याने शेतात जाणे टाळावे, बिबट्या शिकारीच्या शोधात पुन्हा त्याच ठिकाणी येऊ शकतो. याची सर्वानी काळजी घ्यावी. तसेच वन्यप्राण्याला कोणतीही इजा पोहोचली जावु नये; आशा सुचना वनपाल गणेश खंडारे, समाधान धनवट, कर्मचारी शब्बीरी यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT