susaide  
उत्तर महाराष्ट्र

धक्कादायक ः मुल गाड झोपेत...तीने का ? उचलले असे पाऊल ! 

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पती पाटावर कामासाठी गेले असतांना व मुले घरात झोपेत असताना 28 वर्षीय विवाहीतेने मध्यरात्री घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  देवळी (ता.चाळीसगाव) येथे आज सकाळी उघडकीस आली.

आर्वजून पहा :  कोरोना वॉर्डात अमळनेरच्या एकाचा मृत्यू 

देवळी (ता.चाळीसगाव) येथील ललीता सुनील बोरसे(वय28) या विवाहीतेचे पती काल (ता.29) च्या रात्री पाटाच्या कामावर गेले होते. घरी दोन्ही मुले व ललीता बोरसे ह्याच होत्या. रात्री मुले झोपलेले असतांना ललीता बोरसे यांनी घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.आज(ता.30) रोजी पहाटे 1 वाजेच्या पुर्वी ही घटना उघडकीस आली.मुले झोपेतून उठल्याने हा खळबळजनक प्रकार घडला.

गळफास घेतलेल्या महिलेस तिचा पती व शेजारच्यांनी गळफास सोडवून गावातील खाजगी डॉ्नटरांकडे तपासणीसाठी नेले असता विवाहीता मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी दगडू लक्ष्मण बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत. विवाहितेच्या आत्महत्येने देवळी गावात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही चिमुकले आईच्या ममतेला पारखे झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजून आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

Sambhajinagar Students Crisis: गॅसअभावी ‘सिपेट’ची मेस बंद; उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी धरली घरची वाट; ताटात खिचडी, जेवणात अळ्या

Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

SCROLL FOR NEXT