rajesh tope 
उत्तर महाराष्ट्र

मेहुणबारेच्या शवविच्छेदनाचा विषय जाणार आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे ! 

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :  येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृह एक तपापासून बंद पडले आहे. त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात येऊनही अद्याप ते वापरण्यात आलेले नाही. या संदर्भात आजच्या ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच बहाळ- कळमडू गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत साळुंखे यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद देऊन हा विषय आपण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत घेऊन जाऊ व लवकरात लवकर मार्गी लावू अशी ग्वाही दिली.

क्‍लिक कराः भुसावळात अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची अशीही तत्परता

मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृह बंद असल्याने आजच्या ‘सकाळ’मध्ये चाळीसगाव पानावर ‘मेहुणबारे येथील शवविच्छेदनगृह ठरले शो पीस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत साळुंखे यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याकडे हा विषय मांडून जिल्हा परिषदेत त्याचा ठरावही केला होता असे सांगून श्री. साळुंखे यांनी सांगितले, की त्यावेळी हा प्रश्न सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसातच त्यांची बदली झाल्याने हा विषय मागे पडला. आज ‘सकाळ’मधील वृत्तामुळे आता आपण थेट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पुढील योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. रुग्णांना आवश्‍यक असलेल्या सेवा सुविधाही आहेत. केवळ शवविच्छेदनगृहाची तेवढी कमतरता आहे.

सध्या ‘लॉकडाऊन’मध्ये काही अनुचित घटना घडल्यास मृतदेह घेऊन जाण्यासाठी खासगी वाहन मिळेलच असे नाही. त्यामुळे या ठिकाणी शवविच्छेदन होणे गरजेचे आहे. वास्तविक, यापूर्वी या रुग्णालयातून एका कर्मचाऱ्याला शवविच्छेदनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र तरी देखील शवविच्छेदनगृहाचा एकदाही उपयोगात आणले गेलेले नाही. नुकतीच शवविच्छेदनाच्या स्वतंत्र खोलीची दुरुस्ती करण्यात आली असली तरी या ठिकाणी विजेची जोडणी अद्यापही बाकी आहे. शिवाय पाण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी विजेची व पाण्याची सुविधा उपलब्ध करून हे शवविच्छेदनगृह तातडीने वापरात आणावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT