dhanya kharedi center
dhanya kharedi center 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांना माल घेवून बोलावत फिरवता माघारी

योगीराज ईशी

कळंबू (नंदुरबार) : केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री व्यवस्थामध्ये शहादा येथील केंद्रावर नाव नोंदणीनुसार संदेश किंवा मोबाइलवर संपर्क करून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी सकाळी म्हसावद खरेदी केंद्रावर माल घेऊन येण्याचे सांगितले जाते. मात्र शेतकरी तेथे पोहचल्यावर कधी बारदान शिल्लक नाही; तर पावसाच्या वातावरणाचे निमित्त दाखवत माल खरेदीसाठी टाळाटाळ होत आहे.

खरेदी केंद्रावर अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार तालुक्यातील कळंबू येथील शेतकरी रितेश बोरसे व कळंबू येथील पाच ते सहा मालाने भरलेली वाहने खरेदी केंद्रात उभी होती. तसेच तालुक्यातील मंदाणे, सोनवद व इतर खेड्यावरील असंख्य वाहने उभी असतांना खरेदी विक्री संघाचे कर्मचारी केंद्रात आले. शेतकऱ्यांविषयी कोणताही निर्णय किंवा विचार न करता गाडीतूनच त्यांनी सांगितले कि आजपासून तीन ते चार दिवस खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगून तेथून मार्गस्थ झाले. यामुळे कळंबू येथील शेतकरी रितेश बोरसे यांनी शासन शेतकऱ्याच्या माल खरेदी बाबतीत शेतमाल खरेदी धोरण फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.

वेळेवर रक्‍कमही नाही
सर्व आँनलाईन माहिती असतांना शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्रीमध्ये एक ते दोन महिने माल विक्रीचे पैसे खात्यात जमा होत नाही. केंद्र सरकार म्हणते तीन दिवसांत खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातील. असा शासनाचा आदेश असतांना याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने आम्हा शेतकऱ्यांचा होणारा त्रास थांबवा व मालाची खरेदी व रक्कम वेळेवर करावी; अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत केली जात आहे. सर्व शेतकरी संघटना मार्फत शासनाच्या या धोरणाचा निषेध करत असल्‍याचे शेतकरी रितेश खेमराज बोरसे म्‍हणाले.

संपादन ः राजेश सोनवणे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT