उत्तर महाराष्ट्र

बॅण्ड संचालक...पण ढोलच्या ऐवजी हातात तगारी, फावडा 

सकाळन्यूजनेटवर्क

नांद्रा (ता. पाचोरा) :  दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात बॅण्डमध्ये वाद्य वाजवण्याचे काम करणाऱ्या येथील बॅण्ड चालकावर सध्याच्या ‘लॉकडाऊन’मुळे अक्षरशः मजुरी करावी लागत आहे. कोरोनामुळे यंदा विवाहासह अनेक कार्यक्रम रद्द झाल्याने ग्रामीण भागातील बॅण्ड मालकासह त्यावर अवलंबून असलेल्या वादकांच्या पोटाचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे. घरी बसून प्रश्‍न सुटणार नाही, म्हणून येथील बॅण्ड मालकाने मजुरीचे काम पत्करून सध्याच्या परिस्थितीत कुटुंबीयांचा चरितार्थ चालवण्यासाठी हाती तगारी व फावडा घेतला आहे. 

सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गर्दी होऊ नये यासाठी ‘लॉकडाऊन’ वाढवण्यात आल्याने यावर्षी होणारे नियोजित विवाह सोहळ्यांसह अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्याचा फटका ग्रामीण भागातील बॅण्ड चालकासह त्यावर अवलंबून असलेल्या वादकांना बसत आहे. येथील ओम साई बॅण्ड पार्टीचे संचालक आनंदा जाधव हे दरवर्षी परिसरातील अनेक विवाहांच्या सुपारी घेतात. यंदा विवाहाच्या तब्बल २० तारखा बुडाल्यामुळे त्यांचे ४ लाखांपर्यंतचे काम बुडाले आहे. त्यांनी बँकेचे कर्ज घेऊन आपली बॅण्ड पार्टी उभी केली आहे. त्यांच्या बॅण्ड पार्टीतील वादकांनाही त्यांना पैसे द्यावे लागतात. त्यांनी सुमारे सात लाख रुपये खर्च करून एका आयशर गाडीला संपूर्ण स्टीलमध्ये तयार केले आहे. त्यांना मिळालेले बेणे त्यांनी यापूर्वीच आपल्या बॅण्डमधील वादकांना ऍडव्हान्स म्हणून दिले आहेत. आता बॅण्ड वादनाचे काम मिळणेच बंद झाल्याने स्वतःच्या कुटुंबीयांचा चरितार्थ कसा चालवावा, असा प्रश्‍न त्यांना पडला होता. 

सुमारे महिन्यापासून ते घरीच बसून असल्यामुळे काहीही करून दोन पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी ढोलच्या जागी तगारी आणि पावडी हाती घेतली आहे. सध्या रोजाने ते मजूरीवर कामाला जात आहेत. अशीच वेळ इतर वादकांवरही आलेली आहे. अनेक जण मिळेल ते काम करून पोटासाठी दोन पैसे मिळवत आहेत. 

महिन्यापासून बॅण्ड पार्टीला काम नाही. सर्वच जण बसून खात आहेत. लोकांचे देणे, बँकेचे हफ्ते, रोजचा खर्च याची चिंता असल्यानेच मजुरी करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासारखे अनेक वाद्यवादक सध्या मजुरी काम करीत आहेत. शासनाने अशा परिस्थितीत बॅण्डमधील वादकांना आर्थिक मदत करावी. 
- आनंदा जाधव, संचालक ः ओम साई बॅण्ड, नांद्रा (ता. पाचोरा) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT