उत्तर महाराष्ट्र

साक्री तालुक्यात कोरोनामुळे ३१ शिक्षकांचा मृत्यू

काही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अद्यापही कोरोनाविरोधात जीवनसंघर्ष करीत आहेत

जगदीश शिंदे


साक्री : खडू-फळा, पेन, पुस्तक आदी साधनांच्या सहाय्याने बालकांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी लढणारे... माणुसकीची ज्योत हृदयात तेवत ठेवणारे... माणुसकीच्या शत्रूसंगे मूल्य संस्कारांच्या जोरावर युद्ध सुरू ठेवणारे... तालुक्यातील सुमारे ३१ शिक्षक-(techer)शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ (covid-19) च्या रणसंग्रामात लढताना अपयश पदरी आल्यामुळे जीव (death) गमवावा लागला आहे. त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबीयांना (Families) या दुःखातून सावरण्यासाठी जनमानसासह नियतीने आता धीर द्यावा, अंधारात लोटणाऱ्यांच्या कुटुंबातील अंधार दूर व्हावा, अशी भावना सर्वसामान्य शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

(sakri taluka thirty one teachers killed due to corona)


देश आणि राज्यपातळीवर आलेले कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस गडद होत गेले याचा फटका सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, आरोग्य आदींसह शिक्षणक्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य आणि देश पातळीवर सर्वच स्तरांतून जबाबदारपणे प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र हे प्रयत्न अनेक बेजबाबदार नागरिकांच्या बेताल वागण्यामुळे काही अंशी अपयशी होतानाचेही चित्र सर्वसामान्य नागरिकांना अनुभवास येत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य आणि पोलिस प्रशासनासह शिक्षणक्षेत्रातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारीही आपले योगदान निःसंकोचपणे देत आहेत. मात्र हे योगदान देणाऱ्या तालुक्यातील शासकीय अनुदानित १४, जिल्हा परिषदेच्या ४४५, खासगी अनुदानित १४५, खासगी विनाअनुदानित ८, स्वयंअर्थसहाय्यित ३४ अशा एकूण ६४६ शाळांमधील सुमारे तीन हजार ४७३ शिक्षक आणि ८०० च्या जवळपास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३९६ जणांना मार्च २०२० ते मे २०२१ दरम्यान कोरोनाची लागण झाली. यातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील १७३, खासगी अनुदानित शाळेमधील १७८, आश्रमशाळेतील १३, स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील एक अशा सुमारे ३६५ जण आजाराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील १३, खासगी अनुदानित शाळांमधील १६, आश्रमशाळांतील दोन अशा सुमारे ३१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. काही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अद्यापही कोरोनाविरोधात जीवनसंघर्ष करीत आहेत.


कुटुंबीयांच्या दुःखावर सानुग्रहाची चादर...
कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख सानुग्रह सहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केले होते. त्यानुसार हे आदेश ३० सप्‍टेंबर २०२० पर्यंत लागू होते. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या संमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र महाराष्ट्रत सद्यःस्थितीत कोविड-१९ साथीची परिस्थिती विचारात घेता या शासन निर्णयास १ जानेवारी २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा लाभ जीव गमावलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT