corona 
उत्तर महाराष्ट्र

त्या कोरोनाग्रस्त डॉक्टरची... धक्कादायक सेवा 

प्रा. डी. सी. पाटील

शहादा: शहाद्यात एकाच दिवशी पाच रूग्णांचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला. त्यात एका कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या कुटुंबातील चौघांचा समावेश असल्याने नागरिक हादरले आहेत. नऊ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एकासह शहरातील काही डॉक्टर एका नोंदणी नसलेल्या खेतिया रस्त्यावरील क्रिटीकल केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा देत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने तर शहरवासियांची पाचावर धारणच बसली आहे. 

शासनाची परवानगी नसताना गत तीन महिन्यांपासून हे सेंटर शहरात सुरू असताना त्याकडे सहेतूक दुर्लक्ष केल्याने याची सर्वांगीण चौकशी होणे तेवढेच गरजेचे आहे. गत महिनाभराच्या कालावधीत या सेंटरमध्ये किती नागरिकांनी उपचार घेतले याची तपासणी करणे आवश्यक आहे. 

संसर्ग होतो तरी कसा? 
जिल्ह्यात सर्वाधिक नऊ कोरोनाबाधित शहाद्यात आढळून आले असून एकाच मृत्यू झाला आहे. दुर्दैवाने त्याच्या अतिनिकट संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर तपासणी वाढत गेली तशी कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना दोन, दोनाचे चार, चाराचे नऊ रूग्ण शहादेकरांना वेदना देणारे ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग कसा होतोय याची सखोल चौकशी करावी अशी अपेक्षा शहरवासीय करीत आहेत. दुर्दैवाने शहर कोरोना बाधीतांचे हॉटस्पॉट ठरत आहे. 

ट्रॅव्हल हिस्ट्री पुन्हा तपासा 
३२ वर्षीय व्यापाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या अति निकट संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. प्रशासनाने मृत व्यापाऱ्याची ट्रॅव्हल हिस्ट्री व इतर हिस्ट्री गांभीर्याने तपासण्याची पुन्हा गरज आहे. प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरू केले असून यातूनच या तीन दिवसात एका डॉक्टरसह त्याच्या कुटुंबातील अन्य अशा पाच जणाचा पॉझिटीव्ह अहवाल आला. 

त्यांची पुन्हा तपासणी गरजेची 
प्रभाग ७ वरून ही व्याप्ती प्रभाग २ व ४ पर्यंत पोहचली. मृताची ट्रॅव्हल हिस्ट्री वगळता त्याच्या संपर्कात असलेले बाहेरगावी प्रवासाला देखील गेलेले नव्हते अशी माहिती पुढे येत आहे. मग कोरोनाचा संसर्ग यांना कसा झाला हे कोडे आहे. कारण मृताच्या कुटुंबियातील सदस्यांसह इतर संपर्कात आलेल्या नागरिकांचे अहवाल मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह आले असल्याने त्यांची पुन्हा तपासणी होणे गरजेचे आहे. 

ते रूग्णालय सुरू कसे? 
जे तीन रुग्ण बाधित आहे, यांच्यासह शहरातील इतर काही डॉक्टर एका नोंदणी नसलेल्या खेतिया रस्त्यावरील क्रिटीकल केअर सेंटरमध्ये गेल्या तीन महिन्यापासून वैद्यकीय सेवा देत आहेत. मुळात शासनाची कुठलीही परवानगी नसताना गेले तीन महिन्यांपासून बिगर नोंदणीकृत क्रिटीकेअर सेंटर कसे काय सुरू होते याचीही चौकशी या अनुषंगाने होणे गरजेचे आहे. यासोबतच महिनाभराच्या कालावधीत या सेंटरमध्ये किती नागरिकांनी उपचार घेतले याची तपासणी करणे आवश्यक ठरत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर अद्याप परवानगी मिळाली नसताना क्रिटीकेअर सेंटर बिनदिक्कत सुरू होते. याला कोणाचा वरदहस्त होता, प्रशासनातील या शुक्राचार्यांवर कारवाई आवश्यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT