onion
onion 
उत्तर महाराष्ट्र

कॅडबरीपेक्षाही कांदा विकावा लागतो मातीमोल 

कमलेश पटेल

शहादा : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विक्रमी खर्च करून घेतलेल्या कांद्याचा भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून ठेवले असून एका कॅडबरीच्या किंमतीएवढे पैसेही एका किलो कांद्याला मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सर्वसाधारण कॅडबरीच्या पेक्षा किलोभर कांद्याला कमी दर मिळत असल्याने उत्पादकांमध्ये असंतोष आहे. 


गतवर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्या पार्श्वभूमीवर निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर साठवणुकीसाठी निर्बंध घालण्यात आले. आता बाजारात नवीन उत्पादन येऊनही बाजारभाव गडगडलेला आहे. या आठवड्यात तर कांद्याचे भाव पुन्हा प्रतिक्विंटल सोळाशे ते अठराशेच्या घरात पोहोचले आहेत. सहाजिकच यातून उत्पादन खर्च काढणे शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. 

अतिवृष्टी तसेच पोषक हवामानाअभावी यंदा कांद्याचे सरासरी उत्पादन अवघ्या तीस टक्क्यावर आले आहे. उत्पादन खर्च पाहता कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या पुढेच भाव अपेक्षित आहे. परंतु सध्या स्थितीत कांदा अवघा सोळाशे ते अठराशे रुपयांपर्यंत येऊन आला आहे. त्यातच मालाच्या दर्जा फुगवण नसल्याने भाव किती मिळेल याची शाश्‍वती नाही. 

तूट नित्याची; भरणार कधी? 
उत्पादन खर्चाचा विचार करता कमीत कमी प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. प्रति क्विंटल चार हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाल्यास उत्पादन खर्च वजा जाता काही रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येईल. दरातील घसरण ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक तूट निर्माण करणारी ठरत आहे, बाजारात कुठलाही भाजीपाला किमान ४० रूपये किलो दराने विकला जात आहे. बटाटे, गवार, वटाणे यासह अनेक भाजीपाला ३० ते ३५ रुपये सुरू आहे. त्याच तुलनेत मात्र कांदा १५ ते २० रुपये प्रति किलो दराने किरकोळ विक्री सुरू आहे. येथेच उत्पादन खर्चाचा ताळेबंद चुकतो. कांदा उत्पादनासाठी चार महिने अवधी घेतला जातो, किलोभर कांदा उत्पादनाकरीता चार ते पाच रुपये खर्च येतो, मात्र तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. शासनकर्त्यांनी याचा अवश्‍य विचार करून शेतकऱ्याला न्याय देण्याची गरज आहे. 

बाजारात कॅडबरी चॉकलेटची किंमत दहा ते पंधरा रुपये आहे. तेवढ्याच पैशात कांदा किलोने विकावा लागत आहे ही येथील शेतकऱ्याची शोकांतिका आहे. काही मिनिटात तयार झालेला मलई मारलेले दुधाच्या एक ग्लास दहा रुपयांच्या पुढेच आहे तेथे मात्र कांद्याला प्रति किलो नगण्य भावात विकत घेण्याची मानसिकता कधी बदलणार? 
- राकेश सनेर, प्रगतिशील शेतकरी, कुकावल (ता. शहादा) 

यंदा विविध संकटांचा सामना करीत अल्पशे उत्पादन आले आहे. त्यामानाने अपेक्षित भाव मिळत नाही. सरासरी उताराही कमी आहे, त्यामुळे सध्या कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. केंद्राकडून भाववाढीची अपेक्षा आहे. 
- अंबालाल पाटील, कांदा उत्पादक शेतकरी, वरूळ कानडी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT