thief esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : शहादा-खेतिया रस्त्यावर व्यापाऱ्याला लुटले

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहादा-खेतिया रस्त्यावर भरदुपारी चोरट्यांनी दुचाकीचा पाठलाग करीत व्यापाऱ्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याच्याकडील पैशांची बॅग लंपास केल्याची घटना घडली. ( merchant was robbed on Shahada-Khetia road nandurbar crime news )

होलसेल किराणा व्यापारी हिरालाल संचेती यांचे मुनीम संतोष पांडू पाटील शहादा येथून व्यापाऱ्यांकडून साखरेची रोख रक्कम जमा करून दुचाकीने खेडदिगरकडे जात असताना दरा फाट्याजवळ सुसरी धरणाच्या वळणरस्त्यावर नंबरप्लेट नसलेल्या दोन दुचाकींवरील चार जणांनी त्यांचा पाठलाग करीत दुचाकीला धडक दिली.

लोखंडी रॉडने हल्ला करीत संतोष पांडू पाटील यांच्याजवळील पैशांची बॅग घेऊन ते पसार झाले. संतोष पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, म्हसावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी दाखल होत तपासचक्रे फिरविली.

दरम्यान, शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT