उत्तर महाराष्ट्र

पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पार ; उन्हामुळे कस मादेकर चांगलेच घामाघूम

खंडू मोरे

खामखेडा (नाशिक) : मालेगाव पाठोपाठ कसमादे भागातही तापमानात चांगलीच वाढ झाली असून, ‘मे’ हिटचा फटका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बसू लागला आहे.कसमादे भागात माघील आठवड्यापासून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पार असून, प्रचंड उन्हामुळे कसमादेकर चांगलेच घामाघूम झाले आहेत.

वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिकांना बाहेर पडणे टाळत आहेत. मात्र लग्न सराई जोरात असल्याने व जवळचे नातलगात लग्न असल्याने विवाहांना जाण्यावाचून पर्याय नसल्याने उन्हाने लाही लाही होत असताना देखील नागरिक झळा सोसत लग्नांना हजेरी लावत आहेत.

उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी कसमादे भागात एसी, कूलर पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. एप्रिल महिन्याच्या आठवड्यापासून मालेगाव व  जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मागील आठ दिवसांपासून पारा वाढला असून, तो सोमवारी मालेगावात ४४.६ अंश सेल्सिअसवर गेला आहे.

मागील आठवड्यापासून पारा हा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठनार की काय अशी शंका वाटू लागली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत.रणरणत्या उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे.

शेत मळ्यातही दुपारच्या वेळेस अघोषित संचारबंदी झाल्यासारखी स्थिती जाणवून लागली आहे. येत्या काही दिवसापर्यंत उष्णतेत कमालीची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मे महिन्यात वाढणाऱ्या तापमानामुळे घरातील वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे.

तापमानाने केली जिवाची लाहीलाही

घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कूलरने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना! अशी गत उन्हामुळे कसमादे वाशियांची झाली आहे.

यावर्षी एप्रिलपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या.सध्या अगदी सकाळपासूनच उकाडा वाढू लागला आहे.दुपारी दोनच्या सुमारास तर भट्टीजवळून चालतोय की काय? असा अनुभव येत आहे.

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत ऊष्ण वारे वाहत असून वाढत्या उन्हाचा फटका माणसांसोबतच जनावरे आणि पशूपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT