Guardian Minister Anil Patil speaking at the Chetak festival. Jaipalsinh Rawal and others present on the platform next to him. Guardian Minister Anil Patil doing Ashwarpet in the second picture. esakal
उत्तर महाराष्ट्र

Chetak Festival : सारंगखेडा यात्रोत्सव खानदेशसाठी अभिमानाची बाब : पालकमंत्री अनिल पाटील

सारंगखेडा येथील अश्व बाजारात चेतक फेस्टिव्हलमार्फत विविध स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये आलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविश्वसनीय क्षण असतो.

सकाळ वृत्तसेवा

Chetak Festival : सारंगखेडा येथील अश्व बाजारात चेतक फेस्टिव्हलमार्फत विविध स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये आलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविश्वसनीय क्षण असतो. चार राज्यांत भरल्या जाणाऱ्या अश्व बाजारांपैकी सर्वाधिक उलाढाल येथील अश्व बाजारात होते.

सारंगखेडा येथील यात्रा देशातच नव्हे, तर जगात प्रसिद्ध असल्याचे सर्वत्र ऐकायला मिळते.(Minister Anil Patil statement of Sarangkheda yatra is matter of pride for Khandesh Guardian nandurbar news)

खानदेशच्या जनतेसाठी ही बाब अभिमानाची असल्याचे मत मदत व पुनर्वसनमंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले. सारंगखेडा यात्रोत्सवाला पालकमंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी भेट दिली. त्या वेळी चेतक महोत्सवात ते बोलत होते.

या वेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराज रावल, मधुकर पाटील, एल. टी. पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, सी. टी. नाना, मार्केट कमिटीचे संचालक भोजमल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मधुकर पाटील.

युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, राष्ट्रवादी शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी नंदुरबार कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, की येथील यात्रोत्सवाचे नेत्या, अभिनेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे.

यात्रोत्सवाला आठशे वर्षांचा इतिहास आहे. आजही लौकिक कायम आहे. अश्वांच्या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक येत असतात. त्यांच्या परिपूर्ण व्यवस्थेबद्दल आयोजक जयपालसिंह रावल यांचे कौतुक केले.

दत्ताला साकडे, अश्वांवरून फेरफटका

या वेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दत्त मंदिरात जाऊन श्री दत्ताचे दर्शन घेऊन सर्वांना सुखी ठेवण्याचे साकडे घातले. मंदिर प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी अश्व बाजारात जाऊन अश्वांवर फेरफटका मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT