vaccination sakal
उत्तर महाराष्ट्र

Mission Indradhanush: धुळ्यात दीड हजार लाभार्थी लसीकरणापासून वंचित!

रमाकांत घोडराज

Mission Indradhanush : गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्‍चित केले आहे. तीन फेऱ्यांत होणाऱ्या या मोहिमेचा सोमवारी (ता. ७) प्रारंभ होत आहे.

या मोहिमेत लसीकरणापासून वंचित व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. धुळे महापालिका क्षेत्राचा विचार करता तब्बल एक हजार ४७१ लाभार्थी लसीकरणापासून वंचित अथवा त्यांचे अर्धवट लसीकरण असल्याचे समोर आले आहे.

यातील बहुतांश लाभार्थी अल्पसंख्याक भागातील असल्याचे सांगितले जाते. या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. (Mission Indradhanush One half thousand beneficiaries deprived of vaccination in Dhule)

शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांसह गर्भवती मातांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना विविध लशी दिल्या जातात. खासगी तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये या लशी उपलब्ध असतात.

शासकीय दवाखान्यांत या लशी मोफत उपलब्ध असतात, शिवाय शासकीय दवाखान्यात चांगल्या दर्जाच्या लशी उपलब्ध असतात, असा लोकांमध्ये विश्‍वास असल्याने अगदी श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वच नागरिक आपापल्या बालकांना शासकीय, महापालिका दवाखान्यात लसीकरणासाठी आणतात असे चित्र दिसते.

धुळे महापालिकेच्या दवाखान्यांतही नेहमी लसीकरणासाठी रांगा पाहायला मिळतात. असे असले तरी काही लाभार्थी या लशी घेण्यात कुचराई करताना दिसून येतात. अनेक जण निश्‍चित केलेल्या सर्व लशी पूर्ण करत नाहीत अर्थात अर्धवट लशी घेतलेलेही अनेक लाभार्थी असतात.

लशीपासून वंचित अथवा अर्धवट लसीकरणामुळे त्या-त्या आजारांच्या उच्चाटनाच्या कामात अडथळे निर्माण होतात.

आता केंद्र सरकारने डिसेंबर-२०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्‍चित केले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर अशा तीन फेऱ्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची पहिली फेरी सोमवार (ता. ७)पासून सुरू होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील महापालिकेच्या पाच नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते नंदीरोड बाबानगर (नटराज टॉकीज, ऐंशी फुटी रोड) येथील मनपा नागरी आरोग्य केंद्रात मोहिमेचा प्रारंभ होईल.

मनपाच्या प्रभातनगर, कृष्णनगर, राऊळवाडी, नंदीरोड व हजारखोली भागातील दवाखान्यात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

धर्मगुरू, नगरसेवकांची मदत

धुळे महापालिका क्षेत्रात विविध लशींपासून वंचित अथवा अर्धवट लशी घेतलेल्या लाभार्थी बालक व गर्भवती मातांची संख्या सुमारे दीड हजारापर्यंत आहे. या लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणेपुढे आहे.

यासाठी महापालिकेतर्फे विशेषतः अल्पसंख्याक भागात धर्मगुरू, नगरसेवक व इतर मान्यवरांची यासाठी मदत घेतली आहे. त्यासाठी बैठकी घेण्यात आल्या व लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आवाहन करण्याची विनंती केली आहे. याला किती प्रतिसाद मिळतो यावरच आता या मोहिमेचे भवितव्य अवलंबून आहे.

लसीकरणापासून वंचित लाभार्थी

० ते २ वर्षे (वयोगट)...........६३७

२ ते ५ वर्षे.......................७३३

गर्भवती माता.......................१०१

एकूण............................१,४७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT