Mission to prevent infertility in cows and buffaloes in dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण्यासाठी अभियान; पशुपालकांना लाभाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News: जिल्ह्यातील गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील ५४८ गावांमध्ये सर्व पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यकीय चिकित्सालयात राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेट देऊन गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रमेश शिंदे यांनी केले आहे. (Mission to prevent infertility in cows and buffaloes in dhule news)

या वंध्यत्व निवारण अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात ५४८ गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे. शिबिरांमध्ये गायी-म्हशींची तपासणी करून वंध्यत्वाचे निदान करून त्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच जनावरांचे अपेक्षित शारीरिक वजनवाढ व पशू प्रजननाचा थेट संबंध असल्याने शारीरिक वजन घट असलेल्या जनावरांमध्ये वंध्यत्वाची शक्यता अधिक असल्याने अशा जनावरांची तपासणी करून त्यांच्या योग्य पशू आहाराबाबत मार्गदर्शन करून खनिज मिश्रणे पुरविण्यात येणार आहेत.

यासोबतच जनावरांमध्ये गोचीड, गोमाश्या, जंत प्रादुर्भाव असल्यास शारीरिक वजन घट दिसून येते. याबाबत तसेच गायी म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माजाची लक्षणे, मुकामाज अशाबाबत मार्गदर्शन करून योग्य माजाच्या काळात कृत्रिम रेतनासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पशुस्वास्थ्याबाबत जनजागृती

यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, पत्रकवाटप, पोस्टर्स, तसेच प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये गायी म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशींमधील मुकामाज, कृत्रिम रेतन तंत्र, गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ्य याबाबतची माहिती ग्रामस्थांना शिबिरातून देण्यात येत आहे.

शिबिरात पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पशुपालकांकडील नाव, गावनिहाय पैदासक्षम जनावरे, वंध्यत्वाची समस्या असणारी जनावरे, भाकड गायी, म्हशी, माज न दर्शविणाऱ्या कालवडी, पारड्या याबाबतची माहिती गोळा करण्यात येत आहे. शिबिरामध्ये सर्व गायी-म्हशींची तज्ज्ञ टीमद्वारे तपासणी करून योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. सर्व पशुपालकांनी या वंध्यत्व निवारण अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT