Death esakal
उत्तर महाराष्ट्र

विहीरखाली दबल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; पिता बचावला

विहिरीचे खोदकाम सुरू असताना माती धसून त्याखाली दबल्याने मायलेकाचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मोरशेवडी (ता. धुळे) येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना माती धसून त्याखाली दबल्याने मायलेकाचा मृत्यू झाला, तर पिता बचावला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने पोकलँडने बचावकार्य सुरू केले. मात्र, ते पूर्ण होईपर्यंत या दुर्दैवी घटनेत मायलेक गतप्राण झाले होते.

मोरशेवडीत शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ही घटना घडली. तेथील खिरा झामा यांच्या शेतात विहीर खोदकामाचे काम नायडोंगरे (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील भिका छगन पवार (वय ४०), सुनीता भिका पवार (३९), श्याम भिका पवार (१०) यांना मिळाले. पवार कुटुंब विहीर खोदकामाचेच काम करतात. त्यानुसार त्यांनी मोरशेवडी शिवारात हे काम घेतले. या कुटुंबाने शुक्रवारी दिवसभर विहीर खोदकाम केले. यात सायंकाळी विहिरीच्या कठड्याचे काम सुरू असताना माती धसली. त्यामुळे मायलेकासह पिता खाली कोसळले. या घटनेत भिका पवार बचावले. मात्र, माय-लेक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

ही घटना लक्षात येताच अनेक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक अधिकारी प्रकाश पवार व कर्मचारी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणीअंती माती हटविण्यासाठी तत्काळ पोकलँड मागविले. काम सुरू असताना पोकलँड बंद पडले. त्यात विहीर ढासळलेली असल्याने खाली उतरणेही शक्य नव्हते. नंतर शनिवारी सकाळी पुन्हा पोकलँड मागविण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची वाहने, पोकलँडच्या सहाय्याने बचावकार्य सुरू झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. विहिरीचा तळ भुसभुशीत असल्यामुळे, तसेच माती अधिक असल्याने पोलिसांनी एकूण दोन पोकलँड मागविले. शनिवारी दुपारी उशिरापर्यंत माती बाजूला करण्याचे काम सुरूच होते. नंतर या घटनेत सुनीता पवार आणि श्याम या मायलेकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर पिता भिका पवार बचावले. या घटनेमुळे कर्ता पवार व नातेवाइकांना अश्रू अनावर झाले. त्यांना पोलिसांसह ग्रामस्थांकडून धीर दिला जाता होता. या घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

Vinayak Damodar Savarkar Atmaarpan Day 26 Februar : तुजसाठी मरण ते जनन...; स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन!

SCROLL FOR NEXT