accident esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : दोंडाईचा येथे अपघातात मोटारसायकलस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : येथील नगर परिषदेच्या इमारतीसमोर मंगळवारी (ता. २८) मोटारसायकलस्वार ट्रक अपघातात जागीच ठार झाला. रात्री आठच्या सुमारास कुंभारे (ता. शिंदखेडा) येथील सुनील हिलाल पाटील (वय ४०) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (Motorcyclist dies in accident at Dondaicha dhule crime news)

दोंडाईचा येथून कुंभारे स्वतःच्या घरी जात असताना अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील नगर परिषदेच्या इमारतीसमोर हा अपघात झाला.

मालवाहू ट्रक (एमएच १८, बीए २०१६) भरधाव जात होता. चालकाने हुलकावणी दिल्याने सुनील पाटील याच्याकडे असलेली मोटारसायकल (एमएच १४, ईजी १६३३) चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, परिसरात नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. मृत तरुणाचा भाऊ दीपक कुवर (पाटील) यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT