MPSC
MPSC  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule MPSC Exam : धुळ्यातील 25 केंद्रांवर या तारखेला दुय्यम सेवा परीक्षा; परिसरात मनाई आदेश लागू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. ३०) धुळे शहरातील एकूण २५ परीक्षा केंद्रांवर होणार आहे.(mpsc exam Maharashtra Secondary Services Non Gazetted Group B and Group C Services Joint Preliminary Exam on 30 april dhule news)

या परीक्षेस नऊ हजार ७४४ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी परीक्षा केंद्राच्या आवारापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत तरतुदीनुसार मनाई आदेश लागू केला आहे.

मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत संबंधित परीक्षा केंद्रांच्या परिसरात लागू राहतील. परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात परीक्षार्थींशिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती, इजा होईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही.

परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरातील झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, लॅपटॉप, एसटीडी बूथ, ई-मेल, इंटरनेट सुविधा केंद्रे बंद राहतील. परीक्षार्थींना मोबाईल, पेजर, गणकयंत्र आदींचा वापर परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही, असेही श्रीमती धोडमिसे यांनी आदेशात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT