Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 2 मोबाईल टॉवर सील; महापालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेच्या करवसुली पथकाने सोमवारी (ता. २०) सुमारे १२ लाखांच्या थकबाकी (Arrears) वसुलसाठी एटीसी कंपनीचे दोन टॉवर सील केले आहेत. (Municipal tax collection team sealed 2 towers of ATC company for recovery of arrears of around 12 lakhs dhule news)

मालमत्ताकर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या पथकाने केले आहे. धुळे शहरातील बडगुजर कॉलनी आणि वखारकरनगर येथे असलेल्या मोबाईल टॉवरवर ही कारवाई झाली. आर्थिक महिना संपत असताना महापालिका प्रशासन मालमत्ताधारकांकडे थकबाकी वसुलीचा तगादा लावला आहे.

गेल्या पंधरा दिवसांत मालमत्ता कर थकबाकीदारांचे टॉवर, व्यावसायिक गाळे सीलबंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी बडगुजर कॉलनीत एटीसी कंपनीच्या टॉवरवर सुमारे पाच लाखांच्या वसुलीसाठी, तसेच वखारकरनगरमध्ये एटीसी कंपनीच्याच टॉवरवर सुमारे सात लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्याकडे थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करून कारवाई टाळावी आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पथकप्रमुख शिरीष जाधव यांनी केले. पथकातील सदस्य मधुकर निकुंभे, अनिल सुडके, जगदीश पांडे, अजय देवरे, अशोक चौधरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT