nikita patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तरुणीचा गळा चिरून खून

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील नकाणे रोड परिसरातील बालाजीनगरातील निकिता कल्याण पाटील (वय २२) या तरुणीचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळनंतर उजेडात आली.(Murder of young woman in dhule crime news)

निकिता सायंकाळी सहाच्या सुमारास घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून तिचा निर्घृण खून केला. नंतर चाकू घटनास्थळीच ठेवून संशयिताने पळ काढला.

ही घटना कळताच पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश घोटेकर आणि पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

निकिताचे घर एकांतात असून, तिची आई ठिकठिकाणी पोळ्या लाटण्याचे काम करते, तर वडील खासगी वाहनचालक आहेत. त्यांच्यासह तिचा भाऊ घरी नसताना अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली.

पोलिसांनी धागेदोरे तपासत मारेकऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेत पोलिसांना दोन जणांवर संशय आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. निकिता शहरातील एका नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT