Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रूद्राक्ष घेण्यासाठी जाणाऱ्या नणंद भावजयचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा (जि.धुळे) : रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील शिऊर येथे जात असताना शिंदखेडा येथील नणंद भावजयींचा अपघातात मृत्यू (Death) झाला.

काल (ता.१५) रात्री आठच्या सुमारास देवास बायपास रस्त्यावर ही घटना घडली. (Nanand Bhavjay from Sindkheda died in an accident while going to buy Rudraksha dhule news)

भावजयीचे नाव मंगलाबाई अभिमन जाधव (४२) तर नणंदेचे नाव सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (४५) असे आहे. मध्यप्रदेशातील शिऊर येथे रूद्राक्ष वाटपचा कार्यक्रम सुरू आहे. तेथे शहरातील माळीवाड्यातील (जनता नगर) पंधराहून जास्त महिला मंगळवारी (ता.१४) रात्री खासगी वाहनाने गेल्या होत्या.

बुधवारी (ता.१५) रात्री आठच्या सुमारास जेवणासाठी या महिला देवास- बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या. जेवण झाल्यानंतर रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या भरधाव स्कार्पिओने या नणंद भावजयींना उडविले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

यात नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी यांचे जागेवरच निधन झाले. भावजयी असलेल्या मंगलाबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांना देवास येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृतीत थोडी सुधारणा झालेवर त्यांना आज (ता.१६) सकाळी घरी शिंदखेडा येथे घेऊन येताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले.

शिंदखेडा ग्रामीण रूणालयात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील मंगलाबाईच्या कुटुंबात पती, दोन मुले आणि दोन मुली आहेत. तर सुनंदाबाईच्या कुटुंबात पती, दोन मुली, एक मुलगा आहे. शोकाकूल वातावरणात दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT