Accident News Esakal
उत्तर महाराष्ट्र

Accident News : 13 गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात

नंदुरबारमध्ये गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबारमध्ये गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. तब्बल 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत होत्या. गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. 13 गरोदर महिला थोडक्यात बचावल्या.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडा कॉलेज गेटसमोर ही ऍम्ब्युलन्स पलटी झाली आहे. गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. या अपघातात 14 जण जखमी झाले असून, यामध्ये 13 गरोदर मातांचा समावेश आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शहादामधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे रुग्ण होते. ऍम्ब्युलन्स पलटी झाल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी ऍम्ब्युलन्समधून रुग्ण आणि गरोदर मातांना बाहेर काढलं. या ऍम्ब्युलन्सचा अपघात ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे झाला का अतिवेगामुळे झाला या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

या अपघाताची शहादा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची? याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये 13 गरोदर मातांपैकी कोणाच्याही जिवाला धोका पोहोचला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT