Rajesh Jadhav, Manoj Sonar, Pankaj Pathak, Nagsen Pendharkar
Rajesh Jadhav, Manoj Sonar, Pankaj Pathak, Nagsen Pendharkar esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिल्हाध्यक्षपदी राजेश जाधव, तर उपाध्यक्षपदी मनोज सोनार यांची निवड; नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या २०२४-२९ या पंचवार्षिकसाठी बिनविरोध कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले. जिल्हाध्यक्षपदी राजेश जाधव, तर उपाध्यक्षपदी मनोज सोनार, कार्याध्यक्षपदी पंकज पाठक व प्रमुख कार्यवाह म्हणून नागसेन पेंढारकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्त्वाचे काम करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत असते. (Nandurbar Children Theater Council Executive Board of Nandurbar District Branch Announced)

ही संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असून, संस्थेची नंदुरबार जिल्हा शाखेची पंचवार्षिक कार्यकारिणी नंदुरबार शहरातील हि. गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये आयोजित सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी बालरंगभूमी परिषदेची भूमिका विशद केली.

ते म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यात बालप्रेक्षक योजना राबविण्यात येणार असून, त्यात जिल्ह्यातील सर्व शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी नाट्यासह नृत्य, गायन, वादन अशा विविध क्षेत्रांत काम करण्याचा मानस व्यक्त केला. नाट्य प्रशिक्षणात अभिनयासोबतच विविध तंत्रांचेदेखील प्रशिक्षण देऊ, असे सांगितले. (latest marathi news)

शालेयस्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व स्पर्धा राबविण्याचादेखील मानस व्यक्त केला. दिग्दर्शिका क्षमा वासे-वसईकर, चिदानंद तांबोळी, जितेंद्र खवळे, कपिल पाटील, योगेंद्र पाटील, रोहित हराळे, पार्थ जाधव यांच्यासह बालरंगभूमी परिषद, नंदुरबार जिल्हा शाखेचे सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

कार्यकारिणी अशी

अध्यक्ष- राजेश जाधव, कार्याध्यक्ष- पंकज पाठक, उपाध्यक्ष- मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह- नागसेन पेंढारकर, कोशाध्यक्ष- राहुल खेडकर, सहकार्यवाहक- तुषार ठाकरे (उपक्रम), एस. एन. पाटील (प्रशासकीय), कार्यकारिणी सदस्य- रविदा जोशी, हेमंत पाटील, भीमसिंग वळवी, हरीश हराळे, मनोज वसईकर, गणेश महाजन (नवापूर), अलका विष्णू जोंधळे (शहादा), गिरीश वसावे, काशीनाथ सूर्यवंशी. जिल्हा प्रतिनिधी म्हणून कुणाल वसईकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT