Laborers filling the fatal pothole on Sarangkheda road. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : सारंगखेडा-कळंबू रस्त्यावरील ‘तो’ जीवघेणा खड्डा बुजवला

Nandurbar News : सारंगखेडा ते कळंबू रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक खड्डा पडल्याने अपघाताला निमंत्रण देत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

कळंबू : सारंगखेडा ते कळंबू रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक खड्डा पडल्याने अपघाताला निमंत्रण देत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. संबंधित विभागाने याची दखल घेत खड्डा बुजविल्याने वाहनधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सारंगखेडा-कळंबू-कुकावल रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. (Nandurbar dangerous potholes are filled in middle of Sarangkheda to Kalambu road)

सारंगखेड्यापासून कळंबूकडे जाताना वाघदेव (मंदिराजवळ) रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले होते. त्याखाली सिमेंट पाइप असल्याने येथे परिस्थिती ‘जैसे थे’ होत होती. यामुळे रात्री-बेरात्री वाहनचालक, पायी जाणाऱ्यांना धोकादायक ठरत होते. (latest marathi news)

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन जागे झाले. याची दखल संबंधित विभागाने घेत दुरुस्तीचे काम हाती घेत खड्डा बुजविला. येथे लोखंडी सळईची जाळी बनवून सिमेंट टाकून खड्डा बुजविल्याने, वाहनधारक, प्रवाशांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

Stock Market Opening: शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT