White netshade withered due to lack of water esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News: पाण्याअभावी व्हाइटसह ग्रीन नेटशेड ड्राय! दुष्काळाची झळ; शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्चा वाया

Dhule News : या वर्षी नेटशेडलाही दुष्काळाची झळ बसली आहे. पाच लाखांवर खर्च केलेल्या नेटशेड पाण्याअभावी बागायतीविना कोरड्या पडलेल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : शेतकरी नावीन्यतेची कास धरत आहेत. आधुनिक पद्धतीने बागायत करण्यासाठी धडपड असतात. शासनाची योजना आणि कर्ज काढून पैसे उभारतात अन् आधुनिक शेती करण्यासाठी सरसावत असतात. जिल्ह्यात वातावरण बदलाला शह देण्यासाठी व्हाइटसह ग्रीन नेटशेड उभारण्याचे प्रमाण वाढतेच आहे. या वर्षी नेटशेडलाही दुष्काळाची झळ बसली आहे. पाच लाखांवर खर्च केलेल्या नेटशेड पाण्याअभावी बागायतीविना कोरड्या पडलेल्या आहेत. (Dhule lack of water drought Millions of rupees wasted by farmers)

धुळे जिल्ह्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोचत आहेत. यासाठी कृषी सहाय्यक, कृषी मंडळ अधिकारी यांची धडपड वाखाणण्यासारखीच आहे. ते आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवीत आहेत. विविधतापूर्ण पिकांना वातावरण बदलाचा मोठा फटका बसत असतो.

यामुळे उत्पादनात मोठी घट होती. आर्थिक फटका बसत असतो. शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या प्रचार आणि प्रसारामुळे ग्रीन आणि व्हाइट नेटशेडकडे कल वाढला आहे. प्रत्येक शिवारात दोन-चार नेटशेड हमखास दिसून येत आहेत. यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. (Latest marathi news)

गेल्या खरीप हंगामातील दुष्काळामुळे नेटशेडला फटका बसला आहे. विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याअभावी बागायती कोमेजल्या आहेत. लाखांचा खर्च केलेले नेटशेड पडूनच आहेत. वाढत्या तापमानाचा आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्‍यामुळे नेटशेडचेही नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बागेश्वर येथील मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त लोकांना भेट दिली

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT