Dr. Heena Gavit  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : भाजपच्या डॉ. हीना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृती प्रकिया सुरू झाली असून सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृती प्रकिया सुरू झाली असून सोमवारी (ता. २२) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांनी केले आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा संधी मिळाल्याचे घोषित झाल्यापासून खासदार डॉ. हीना गावित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सोमवारी जल्लोषात रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत सकाळी अकराला त्या अर्ज दाखल करतील. भाजपतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.

सकाळी नऊला मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा निवासस्थानापासून रॅलीद्वारे डॉ. हीना गावित अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. मंत्री डॉ. विजयकुमार गावित. (Latest Marathi News)

आमदार प्रवीण दरेकर आदी पक्षाचे नेते उपस्थित राहतील. महायुतीतील मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुंवशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहतील, अशी अपेक्षा मंत्री डॉ. गावित, खासदार डॉ. गावित यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT