Dr. Heena Gavit, Gowaal Padavi  Esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : लग्नसमारंभ, गावभेटीतून उमेदवार साधताहेत मतदारांशी संवाद

Nandurbar News : राजकीय नेते म्हणून एरवी एखाद्या गावाला भेट देणे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवत गाव भेटीतून थेट नागरिकांशी संवाद साधणे यात मोठा फरक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : राजकीय नेते म्हणून एरवी एखाद्या गावाला भेट देणे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवत गाव भेटीतून थेट नागरिकांशी संवाद साधणे यात मोठा फरक आहे. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना १८ एप्रिलपासून काढण्यात येणार असली तरी भाजपच्या उमेदवाराचे नाव सर्वप्रथम पक्षाने जाहिर केल्याने डॉ. हिना गावित यांनी गावभेटी, लग्न समारंभ. (Nandurbar Lok Sabha Constituency)

विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्यात आघाडी घेतली आहे. तसेच कॉंग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवीही मागे नाहीत. त्यांनीही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले की, मतदारसंघातील विकास कामांसोबतच जनतेच्या प्रश्‍नांचे विचार लोकप्रतिनिधी करू लागतात.

त्यामुळे निवडणूक फॅड तयार केले जाते. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी करायचे निश्‍चित होते. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षभरापासूनच विविध योजनांची अंमलबजावणी सोबत त्यांचे उद्घाटन, शुभारंभच्या माध्यमातून आपले वर्चस्व मतदार संघावर कायम ठेवण्यात आघाडीवर राहिल्या.

तसेच मतदारसंघातील मिळालेल्या विवाह सोहळा,धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे निमंत्रण स्विकारत तेथे उपस्थिती देत राहिल्या. त्यांना जमसंपर्कासाठी वेळ मिळाला. आताही त्या सुरूवातीपासूनच कामाला लागल्या आहेत. त्यांनी गावभेटीतून जनतेशी संवादाचा टप्पा पूर्ण केला. त्या आता गावपातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन करतांना दिसत आहेत. (Latest Marathi News)

तसेच कॉंग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचे नाव ऐनवेळेस आले असले तरी लोकसभेची निवडणूक लढवायची हे माजी मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी निश्‍चित केले होते. त्यामुळे ॲड. पाडवी यांनीही शक्य तेवढ्या गावांमध्ये संपर्क वाढवला होता. त्यातून त्यांनी निवडणुकीची मार्केटींग करण्यास सुरूवात केली होती.

त्याचा फायदा त्यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना होत असल्याचे चित्र आहे. डॉ.हिना गावित व ॲड. गोवाल पाडवी हे गाव भेटीवर लक्ष केंद्रीत करीत आपआपल्या निवडणुकीचे नियोजन करतांना दिसत आहेत. तसेच काही अपक्ष उमेदवारही आपल्या परिने गाव -परिसरात आपण उमेदवारी करणार असल्याचे डंका वाजवतांना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT