Gowal Padavi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गुगलीने अनेकांना धक्का!

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनाच उमेदवारी मिळेल, हे जवळपास निश्चितच होते.

धनराज माळी

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनाच उमेदवारी मिळेल, हे जवळपास निश्चितच होते. मात्र काँग्रेसचे उमेदवार कोण? याबाबत संदिग्धता होती. पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. (Nandurbar Lok Sabha Election 2024)

असे असताना नवख्या ॲड. गोवाल पाडवी यांनी उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसमध्येच अनेकांना धक्का बसला आहे. सर्वसामान्यांमध्ये फारसे चर्चेत नसलेल्या या नावामुळे सारेच अवाक झाले आहेत. काँग्रेसची ही गुगली कितपत जादू करते, हे येणारा काळच ठरवेल. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ३५ वर्षे निर्विवाद वर्चस्व राहिले.

त्याला सुरुंग लावत भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी दोन पंचवार्षिक मोठ्या मताधिक्याने जिंकून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात इतिहास घडविला. प्रत्येक वेळी उमेदवारांची भाऊगर्दी असताना दिवंगत खासदार माणिकराव गावित यांनी प्रत्येक निवडणूक अत्यंत बिनधास्तपणे जिंकून ३५ वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवला.

मात्र २०१४ पासून या बालेकिल्ल्यास भाजपच्या माध्यमातून डॉ. हीना गावित यांनी सुरुंग लावला. त्यानंतर हा किल्ला चांगलाच ढासळला आहे. खासदार म्हणून चांगले काम व थेट जनतेशी निर्माण केलेल्या जनसंपर्कामुळे डॉ. हीना गावित असतील किंवा त्यांचे वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित असो, यांनी आपली पकड घट्ट केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड म्हणून सध्या ओळखला जात आहे. (latest marathi news)

काँग्रेसच्या उमेदवारीबाबत मतदारसंघातील जनतेमध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. गेल्या निवडणुकीत माजी मंत्री के. सी. पाडवी यांना पराभव पत्करावा लागला होता. या वेळी ते उमेदवारी करतात की नाही, असा प्रश्‍न होता. मात्र जसजसे निवडणुकीचे वारे वाहू लागले, तसतसे काँग्रेसमधील इच्छुकांची यादीही वाढू लागली. त्यात अनेक दिग्गजांचा समावेश होता.

त्यात सर्वप्रथम माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या स्नुषा रजनी नाईक, त्यानंतर दुसऱ्या सीमा वळवी यांची नावे चर्चेत होती. दोन्हीही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्या जिल्ह्यात परिचित आहेत. असे असताना आमदार के. सी. पाडवी यांनी पुन्हा उमेदवारीसाठी आघाडी घेतली. सध्या ते जिल्ह्याचे पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी नाईक कुटुंबाला थांबवले.

पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी फिल्डिंग लावली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जिल्ह्यात दोन दौरे झाले. त्यामुळे ॲड. पाडवी यांचा बाजूने कौल झुकला असल्याचे पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना जाणवत होते. त्यामुळे ‘केसीं’चे नाव पुढे आले. पक्ष निरीक्षकांच्या बैठकांमध्येही पहिल्या क्रमांकावर त्यांचेच नाव होते.

साऱ्यांनाच काँग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. राहुल गांधींचा दौरा झाला. काँग्रेसचे चांगले वातावरण निर्माण झाले. अशातच उमेदवारांची यादी काँग्रेसने दिल्ली येथून जाहीर केली. मात्र त्यात ॲड. के. सी. पाडवींऐवजी त्यांचा मुलगा ॲड. गोवाल पाडवी यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे पक्षासह मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही चांगलाच आश्‍चर्याचा धक्का बसला.

साऱ्यांनाच प्रश्‍न पडला. गोवाल पाडवी कधी पक्षांच्या बैठकांना नाही, ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली नाही, अनेकांना तर गोवाल यांचे नावही माहीत नाही. इच्छुकांच्या यादीत नाव नाही. उमेदवारांच्या मुलाखतीला हजर नाही. तरीही थेट लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसची ही गुगली आहे की आणखी काही, हे लवकरच समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT